काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
सिपकोट पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोपी हरी पोलिसांच्या चकमकीत सापडला. पोलिसांच्या सहाय्यक निरीक्षकावर चाकूने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, हरीच्या पायात गोळी लागली आणि तो पकडला गेला. जिल्हा पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला यांच्या आदेशानुसार दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. विशेष पथकाचे पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा कसून तपास करत होते. यादरम्यान, पोलिसांनी त्या भागातील 10 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली.
advertisement
पोलीस कर्मचाऱ्यावर केला चाकूने वार
याशिवाय, सिपकोट पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक मुथिश्वरन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सतत तपास करत होते. याच दरम्यान, पोलीस कावेरीपक्कमजवळ गस्त घालत होते. तेव्हा पोलिसांनी हरीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हरीने पोलीस सहाय्यक निरीक्षक मुथिश्वरन यांच्यावर चाकूने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर, पोलिसांनी हरीला पळून जात असताना पायात गोळी मारली, तो जखमी झाला त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं. सध्या, हरीच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस सहाय्यक निरीक्षक मुथिश्वरन आणि गोळी लागून जखमी झालेला हरी दोघेही वेल्लोर सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
हे ही वाचा : Online Fraud: "पहिले पैसे द्या, मग पैसे मिळवा", ही स्किम तरुणाला पडली महागात, 52 लाखांना लागला चुना
हे ही वाचा : "टॅक्सीवाल्याने माझ्यावर...", फाटलेल्या कपड्यांसहीत पोहोचली पोलीस ठाण्यात, सत्य समोर येताच सगळेच चक्रावले