"टॅक्सीवाल्याने माझ्यावर...", फाटलेल्या कपड्यांसहीत पोहोचली पोलीस ठाण्यात, सत्य समोर येताच सगळेच चक्रावले

Last Updated:

ग्वाल्हेर पोलिसांनी बलात्काराच्या खोट्या आरोपाचा पर्दाफाश केला आहे. एका महिलेने कट रचून खोट्या गुन्ह्याची तक्रार केली होती. पोलिसांनी सात तासांच्या तपासानंतर सत्य उघड केले. या कटामागे हत्या प्रकरणातील साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता. आता पोलिसांनी महिलेविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

False Rape Accusatio
False Rape Accusatio
एका महिलेने टॅक्सी ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात दिसून आलं की, महिलेने 3.30 वाजता बलात्काराची तक्रार करण्यापूर्वी 12.30 वाजता पोलिसांनी फोन केला होता. या प्रकरणात पोलीस अधिक दक्ष झाले आणि त्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली, तर बलात्काराची घटनाच घडली नसल्याचे निष्पन्न झालं.
...असा घडला आणखी एक गुन्हा
ही घटना ग्वाल्हेरच्या घाटीगाव पोलीस स्टेशन परिसरात घडली. ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंह यादव यांनी सांगितले की, "पोलीस तपासात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या एका खून प्रकरणातील तक्रारदाराला अडकवण्यासाठी तुरुंगातीलच एका आरोपीने कट रचल्याचं उघड झालं आहे. एका महिला नातेवाईकाच्या मदतीने त्याने तक्रारदारावर बलात्काराचा आरोप केला. त्या महिलेने सांगितलं होतं की, घाटीगावच्या घेघोलीमधील जंगलात बलात्कार झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला, तेव्हा प्रकरण संशयास्पद वाटलं. गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि 7 तासांच्या तपासाअंती हे प्रकरण खोटं असल्याचं समोर आलं. या गोष्टीचा पर्दाफाश होताच, महिलेने तक्रार देण्यास नकार दिला. आता पोलीसच त्या महिलेवर कारवाई करत आहेत."
advertisement
जमिनीच्या हव्यासापोटी खून, त्यानंतर...
पोलrस तपासात असं समोर आलं की, 2 महिन्यांपूर्वी बेलगढा भागात 67 वर्षीय कुसुम बाई यांची हत्या झाली होती. या प्रकरणी मानसिंग जाटाव, नारायण प्रजापती आणि हकीम प्रजापती यांच्यावर आरोप होता. त्यांनी जमिनीच्या हव्यासापोटी खून केल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत आणि मयत महिलेचा नातू आकाश प्रजापती हा मुख्य साक्षीदार आहे.  केसमध्ये सेटलमेंट करण्याची ऑफर देऊनही तो तयार झाला नाही. त्यानंतर मानसिंगने त्याच्यावर दबाव आणण्यासाठी कट रचला. यासाठी त्याने आपल्या मुलाच्या बायकोच्या बहिणीला बलात्कार केस दाखल करण्यासाठी तयार केलं.
advertisement
तपासानंतर खोटं उघड, महिलेने तक्रार न देताच काढता घेतला पाय
पोलिसांना हे समजताच त्यांनी महिलेची चौकशी केली. तेव्हा ती आकाशला फसवण्यासाठी 8 दिवसांपासून कारस्थान करत होती, असं उघड झालं. कटानुसार, तिने आकाश प्रजापतीची गाडी भाड्याने घेतली आणि मोहाना गुरुद्वारा येथे पोहोचली. काही मिनिटे थांबल्यानंतर ती घाटीगावच्या जंगलात पोहोचली आणि तिथे गाडी थांबवून फोटो आणि व्हिडिओ काढले. मात्र पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यानंतर तपास केला आणि महिलेचं खोटं उघड झालं. त्यानंतर ती तक्रार न करताच निघून गेली. सध्या, पोलिसांनी खोटी कहाणी सांगून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल महिलेवर कारवाई सुरू केली आहे.
advertisement
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
"टॅक्सीवाल्याने माझ्यावर...", फाटलेल्या कपड्यांसहीत पोहोचली पोलीस ठाण्यात, सत्य समोर येताच सगळेच चक्रावले
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement