तेजेश्वर 17 जूनच्या सकाळी घरातून बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी तेजेश्वरच्या भावाने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना तेजेश्वर काही ओळखीच्या लोकांसोबत कारमध्ये जातानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. चार दिवसांनंतर, 21 जून रोजी त्याचा मृतदेह आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील पान्याम शहराजवळ सापडला.
अशी रचला हत्येचा प्लॅन
एसपी म्हणाले, “तेजेश्वर आणि ऐश्वर्याची 2020 मध्ये एंगेजमेंट झाली होती. मात्र, ऐश्वर्याचे संबंध तिरुमालासोबत सुरूच होते. लग्नानंतर हे संबंध पुढे चालू ठेवणे कठीण झाले. त्यानंतर दोघांनी मिळून सुपारी देऊन तेजेश्वरला मारण्याचा प्लॅन केला.” यासाठी तिरुमालाने नागेश नावाच्या एका कमिशन एजंटशी संपर्क साधला आणि त्याला तेजेश्वरचा फोन नंबर दिला. तेजेश्वरशी मैत्री केल्यानंतर त्याला त्याची हत्या करण्याचे फर्मान सोडले. नागेश आणि त्याच्या साथीदारांना एक जीपीएस ट्रॅकरही देण्यात आले होते. त्यांनी तो तेजेश्वरच्या बाईकला गुप्तपणे लावला, जेणेकरून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
advertisement
17 जून रोजी नागेश आणि त्याच्या साथीदारांनी तेजेश्वरला जमीन सर्वेक्षणाचे काम असल्याचे सांगून कर्नूलला बोलावले. परत येताना त्यांनी डोक्यात मारून, गळा चिरून आणि पोटात चाकू खुपसून तेजेश्वरची हत्या केली. घटनास्थळी पोहोचल्यावर तिरुमालाने त्यांना मृतदेह कर्नूलमधील दुसऱ्या रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी टाकण्यास सांगितले. वाटेत मारेकऱ्यांनी आपले कपडे बदलले आणि तेजेश्वरचा मोबाईल फोन व इतर सामान कालव्यात फेकून दिले. वृत्तानुसार, तेजेश्वरने हत्येच्या दिवशी सुपारी घेतलेल्या मजुरांना 1 लाख रुपये आणि 20 जून रोजी आणखी 1 लाख रुपये दिले होते. सर्व आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी तिरुमालासोबत ऐश्वर्याच्या आईचे होते संबंध
जिल्हा पोलीस अधीक्षक टी. श्रीनिवास राव यांनी सांगितले की, ऐश्वर्याचा प्रियकर तिरुमाला राव हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. कर्नूलमधील एका हाउसिंग फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणारा तिरुमालाचे ऐश्वर्याची आई सुजातासोबत दीर्घकाळ संबंध होते. सुजाता याच कार्यालयात सफाई कामगार म्हणून काम करत होती. पण काही काळानंतर तिरुमाला त्यांच्या मुलीच्या जवळ आला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. मात्र, योजनेनुसार काहीही झाले नाही. पोलिसांनी सांगितले की, ऐश्वर्याची आई आणि कुटुंबाने तिच्यावर तेजेश्वरसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. पोलिसांनी असेही सांगितले की, ऐश्वर्या आणि तिरुमालाने हत्येनंतर लडाखला जाण्याची योजना आखली होती.
हे ही वाचा : भर रस्त्यात नवऱ्याला धू-धू धुतला; बायकोने दिली प्रियकराची साथ अन् बाईकवर बसून झाली फरार, वाचा सविस्तर...
हे ही वाचा : पतीच्या मृत्यूने पत्नी होती खूश; पोलिसांना म्हणाली, "रोज मारत होता", घरात सापडली अशी 'वस्तू' की...