मिरवणूकीत गाणी लावण्यावरून वाद
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाचगावमध्ये सोमवारी (25 ऑगस्ट) रात्री गणपतीच्या आगमणाची मिरवणूक निघाली होती. बळवंतनगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते गाण्याचा ठेक्यावर नाचत होते. या कार्यकर्त्यांमध्ये हृषीकेश भोसले हा कार्यकर्ता प्रतीक सरनाईक याचे गाणे लावून नाचत होते. प्रतीक सरनाईक हा 2018 साली प्रतीक पवार याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तर हृषीकेश नाचत असताना रणजीत गवळी, चेतन गवळी आणि अरुण मोरे या तिघांनी गाणी लावण्यावरून हृषीकेशसोबत वाद घातला.
advertisement
तिघांनी बंदूक काढली अन् त्याच्यावर रोखली
पुढे मिरवणूक संपल्यानंतर हृषीकेश रात्री दीडच्या सुमारास घरी निघालेला असताना तिघांनी अडवले. रणजीत गवळी आणि अरुण मोरे हे दोघेजण वेगन गाडीतून आले. रणजीने बंदूक काढली आणि हृषीकेशच्या डोक्याला लावली. "आता तुला जिवंत सोडत नाही", म्हणत धमकावले. पुढे परिसरातील महिलांनाही बंदुकीचा धाक दाखवला. याचा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर हृषीकेशने करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कळवण्यात आले.
सापळा रचून पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या
हृषीकेशला धमकावणारे हे 3 आरोपी बंदूक घेऊन वेगन गाडीतून पाण्याचा खजिना येथे येणार आहेत, अशी टीप मिळाली. पोलिसांनी सापळा रचून तिघांनी अटक केली. त्यांच्याकडून बंदूक, जिवंत काडतुसे, कार आणि दुचाकी असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
हे ही वाचा : नवीन गॅस कनेक्शन घेतलं अन् त्याचदिवशी झाला स्फोट, महिलेचा मृत्यू; कोल्हापूरातील घटनेला जबाबदार कोण?
हे ही वाचा : Ratnagiri News: आईचा गळा चिरला, स्वतःच्या हाताची नस कापली, पोटच्या मुलाचं सैतानी कृत्य, पण का?
