हे प्रकरण दिह पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परशदेपूर गावची रहिवासी असलेल्या नीलमशी संबंधित आहे. नीलमचा विवाह अवघ्या सहा वर्षांपूर्वी घुरुवारा गावातील दीपक नावाच्या तरुणाशी झाला होता. त्यावेळी नीलम अल्पवयीन होती, पण कुटुंबाच्या इच्छेनुसार तिचे लग्न झाले. नीलम सांगते की, कमी वयात लग्नाचे दुःख तिने सहन केले, पण कोणाकडेही कधी तक्रार केली नाही. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल असे तिला वाटले, पण तसे झाले नाही.
advertisement
'वांझोटी' म्हणून टोमणे
लग्नाला सहा वर्षे होऊनही मूलबाळ न झाल्याने सासरच्या मंडळींनी तिला 'वांझोटी' म्हणून टोमणे मारायला सुरुवात केली. परिस्थिती इतकी बिघडली की नीलमला सासर सोडून रायबरेलीमध्ये आपल्या बहिणीकडे येऊन राहावे लागले. इथेच तिची भेट वीरेंद्र नावाच्या एका दिव्यांग तरुणाशी झाली. तो व्हीलचेअरच्या साहाय्याने जीवन जगतो. वीरेंद्रने नीलमची काळजी घ्यायला सुरुवात केली, तिला आदर देऊ लागला. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली.
बेपत्ता झाल्याची तक्रार
नीलम सांगते की, तिचा पती दीपकचा स्वभाव रोज भांडण्याचा होता. तिच्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी त्याला समजावण्यात आले, पण नीलमला परत अशा आयुष्यात जायचे नव्हते जिथे तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचत होती. तिने पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार दिली आणि आपल्या सासरच्या मंडळीं विरोधात तक्रार केली. यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी दालमऊ पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली.
जो माझा सन्माम करेल, त्याच्यासोबतच...
पोलिसांनी नीलमला शोधून न्यायालयात हजर केले. तिथे तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, तिला आता आपल्या पतीसोबत राहायचे नाही. तिने न्यायालयात आपल्या 164 च्या जबाबातही तीच गोष्ट पुन्हा सांगितली. आता नीलम आपल्या दिव्यांग प्रियकरासोबत स्वेच्छेने राहत आहे. नीलमची आई केश कुमारी यांनी लोकल 18 ला सांगितले की, नीलमची भेट रायबरेलीला उपचारासाठी येत असताना वीरेंद्रशी झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आता ती त्याच्यासोबतच राहण्यावर ठाम आहे. नीलम स्पष्टपणे म्हणते की, "जो माझा आदर करतो, माझी काळजी घेतो, त्याच्यासोबतच मला राहायचे आहे."
हे ही वाचा : क्रिकेटचा वाद अन् 10 वीच्या विद्यार्थ्याचा खेळ खल्लास, मधल्या सुट्टीत 8वीच्या पोरानं पाडला रक्ताचा सडा
हे ही वाचा : पैशासाठी वाट्टेल ते! रेकाॅर्ड व्हिडीओ ₹500, लाईव्ह व्हिडीओसाठी ₹2000... स्वीट कपलचा 'धंदा' पाहून चक्रावले पोलीस