TRENDING:

Cyber Crime : एका क्लिकमुळे कसं रिकामी होतं अकाउंट? सायबर अटॅक नक्की कसं होतं? हे रोखण्यासाठी उपाय काय, वाचा

Last Updated:

कधीकधी बँकेतून बोलतोय असा एक साधा फोन येतो किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत गिफ्टची एक लिंक येते आणि आपण कुतूहलापोटी त्यावर क्लिक करतो. पण हेच एक छोटं क्लिक तुमच्या आयुष्याची कमाई एका मिनिटात रिकामी करू शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सर्वात जास्त वेळ कुठे देतो? असा प्रश्न विचारला तर त्याचं साहजिकच, त्याचं उत्तर असेल आपला स्मार्टफोन. बँकिंग असो, ऑनलाईन शॉपिंग, ऑफिसची मीटिंग किंवा मित्र-मैत्रिणींशी गप्पा आपलं संपूर्ण आयुष्य आता डिजिटल झालं आहे. पण, ज्या वेगाने आपण तंत्रज्ञानाच्या जवळ जात आहोत, त्याच वेगाने 'डिजिटल चोर' म्हणजेच सायबर गुन्हेगारही आपल्या जवळ येत आहेत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

कधीकधी बँकेतून बोलतोय असा एक साधा फोन येतो किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर मोफत गिफ्टची एक लिंक येते आणि आपण कुतूहलापोटी त्यावर क्लिक करतो. पण हेच एक छोटं क्लिक तुमच्या आयुष्याची कमाई एका मिनिटात रिकामी करू शकतं. त्यामुळे कोणत्याही ओळखी मॅसेजवरुन आलेल्या लिंकवर क्लिन न करण्यासाठी वारंवार सांगितलं जातं, पोलीस देखील या गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी लोकांना सल्ले देत असतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की एका क्लिक ने सायबर अटॅक कसा होतो? किंवा एका क्लिकमुळे अकाउंट रिकामी कसं होतं? नक्की काय आहे हा 'सायबर अटॅक' आणि आपण यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो? चला सविस्तर जाणून घेऊया.

advertisement

सायबर अटॅक म्हणजे नेमकं काय?

जेव्हा एखादा हॅकर किंवा गुन्हेगार तुमच्या संगणकात, मोबाईलमध्ये किंवा कोणत्याही डिजिटल सिस्टीममध्ये बेकायदेशीरपणे शिरकाव करतो, तेव्हा त्याला सायबर अटॅक म्हणतात. यांचा मुख्य उद्देश तुमचा खाजगी डेटा चोरणे, तुमचे पासवर्ड मिळवणे किंवा तुमच्या बँक खात्यातून पैसे लंपास करणे हा असतो. अनेकदा तर तुम्हाला कळेपर्यंत तुमचा सोशल मीडिया अकाऊंट किंवा बँकिंग माहिती हॅकर्सच्या ताब्यात गेलेली असते.

advertisement

हॅकर्स तुम्हाला कसं जाळ्यात ओढतात?

1. फिशिंग (Phishing):

तुम्हाला एखाद्या नामांकित बँकेच्या किंवा कंपनीच्या नावाने हुबेहूब दिसणारा बनावट ई-मेल किंवा मेसेज पाठवला जातो. यात "तुमचे केवायसी अपडेट करा" किंवा "लॉटरी लागली आहे" असे सांगून एका लिंकवर क्लिक करायला भाग पाडले जाते.

2. बनावट अ‍ॅप्स:

अनेकदा जाहिरातींद्वारे आपण अनोळखी अ‍ॅप्स डाऊनलोड करतो. हे अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमधील गॅलरी, मेसेजेस आणि कॉन्टॅक्ट्सचा अ‍ॅक्सेस मिळवून तुमचा डेटा चोरतात.

advertisement

3. कमकुवत पासवर्ड:

जर तुमचा पासवर्ड तुमचा मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख असेल, तर हॅकर्सना ते क्रॅक करणे अत्यंत सोपे जाते.

सायबर अटॅकचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो?

जर तुम्ही सायबर हल्ल्याचे शिकार झालात, तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात:

आर्थिक नुकसान: तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.

ओळख चोरी (Identity Theft): तुमच्या नावाने दुसरेच कोणीतरी गुन्हेगारी कृत्य करू शकते.

advertisement

ब्लॅकमेलिंग: तुमचे खाजगी फोटो किंवा चॅट्स चोरून तुम्हाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते.

डेटा लॉस: तुमची वर्षानुवर्षांची महत्त्वाची कागदपत्रे किंवा आठवणी (फोटो) नष्ट होऊ शकतात.

डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचे 5 सुवर्ण नियम:

1. पासवर्डमध्ये अक्षरे, अंक आणि चिन्हांचा (उदा. @, #, $) वापर करा. तसेच, दर 3 महिन्यांनी पासवर्ड बदला.

2. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA): तुमच्या सर्व सोशल मीडिया आणि बँकिंग अकाऊंट्सना 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' चालू करा. यामुळे पासवर्ड माहित असला तरी ओटीपीशिवाय कोणीही लॉग-इन करू शकणार नाही.

3. व्हॉट्सअ‍ॅप किंवा ई-मेलवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, मग ती तुमच्या जवळच्या मित्राने पाठवली असली तरीही!

4. तुमच्या मोबाईल आणि संगणकाचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. कंपनी वेळोवेळी सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी पॅच पाठवत असते.

5. लक्षात ठेवा, कोणतीही बँक फोनवर किंवा मेसेजवर तुमचा पिन, ओटीपी किंवा पासवर्ड मागत नाही. अशी मागणी झाल्यास लगेच सावध व्हा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

डिजिटल युगात 'सावधगिरी' हाच सर्वात मोठा बचाव आहे. तंत्रज्ञानाचा वापर नक्की करा, पण डोळसपणे. तुमची थोडीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून वाचवू शकते.

मराठी बातम्या/क्राइम/
Cyber Crime : एका क्लिकमुळे कसं रिकामी होतं अकाउंट? सायबर अटॅक नक्की कसं होतं? हे रोखण्यासाठी उपाय काय, वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल