बहिणीला बोलल्याचा राग ठेवून मारहाण
पोलिसांकडून समोर आलेली माहिती अशी की, अमीर सय्यद हे संगणक प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या गाडीला परदेशी नावाच्या महिलेने रविवारी (दि. 10) धडक दिली होती. त्यावेळी सय्यद यांनी संबंधित महिलेला "गाडी चालवता येत नसेल, तर चालवू नका", अशी सूचना केली. हा प्रकार बहिणीने भावास जाऊन सांगितला. त्यामुळे बहिणीला बोलल्याचा राग भावाने डोक्यात ठेवला.
advertisement
मारहाणीत दात उखडून पडला
रागाने लालबुंद झालेला हा भाऊ सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास सय्यद यांच्या फ्लॅटमध्ये येऊन मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यांच्या तोंडावर ठोसा मारल्यामुळे त्यांचा एक दात मुळापासून उखडून पडला. या मारहाणीत सय्यद यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना विश्रामबाग पोलीस ठाण्यात परदेशी नावाच्या महिलेल्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
हे ही वाचा : परभणी: रक्षाबंधनाला माहेरी जात होती तरुणी, वाटेत झाला घात, 3 दिवसांनी मुलासह आढळली मृतावस्थेत
हे ही वाचा : थकले होते कर्जाचे हप्ते, वसुली करणाऱ्याचा आला राग, 4 मित्रांना घेतलं सोबत अन् केला मोठा कांड, कारण ऐकून व्हाल थक्क!
