थकले होते कर्जाचे हप्ते, वसुली करणाऱ्याचा आला राग, 4 मित्रांना घेतलं सोबत अन् केला मोठा कांड, कारण ऐकून व्हाल थक्क!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर शहरातील स्माॅल फायनान्स कंपनीकडे वसुली व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला 5 जणांना लुटल्याची घटना घडली आहे. वसुली करून येणाऱ्या व्यक्तीला...
कोल्हापूर : शहरातील स्माॅल फायनान्स कंपनीकडे वसुली व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला 5 जणांना लुटल्याची घटना घडली आहे. वसुली करून येणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडून 1 लाख 70 हजार लुटल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कोल्हापुकडे येताना कळंबा रस्त्यावर घडली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्यावर अडवले आणि मारहाण करत लुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्माॅल फायनान्स कंपनीकडे वसुली मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे सूरज बाळासाहेब पाटील (वय-31, रा. सानेगुरूजी वसाहत) 4 ऑगस्ट रोजी इस्पुर्ली ते येवती या गावांतील बचत गटातर्फे दिलेल्या कर्जाचे हप्ते वसुल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या 1 लाख 70 रुपये होते. हे पैसे घेऊन ते कोल्हापुरच्या दिशेने निघाले होते. मात्र, कळंबा रस्त्यावर भिवटे मिलजवळ तिघांनी अडविले आणि मारहाण करून त्यांच्याजवळील पैशांवर डल्ला मारला.
advertisement
3 आरोपींसह 2 अल्पवयीन ताब्यात
यासंदर्भात सराईत गुन्हेगार विजय मोहन पुजारी (वय-19, रा. मंगोबा देवालयजवळ उचगाव, ता. करवीर), स्वरुप रमेश सावंत (वय-21), सुशांत भगवान कांबळे (वय-22, दोघेही रा. लक्ष्मी काॅलनी टेंबलाईवाडी), अविनाश आनंदा मोहिते (वय-30), अनिकेत कृष्णात ताटे (वय-27, रा. इस्पुर्ली, ता. करवीर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय आणखी अल्पवयीन दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
चोरीनंतर चोरांनी मुद्देमालाची केली समान वाटणी
वसुली मॅनेजर पाटील यांनी लुटल्यानंतर या पाच जणांना रकमेची समान वाटणी केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडील रकमेची बॅग, टॅब आणि इतर मुद्देमाल जप्त केलेला आहे. ही लुटमार सराईत गुन्हेगार विजय पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची पोलीस तपासात समोर आले आहे. टेंबलाई मंदिर परिसरातून विजय पुजारी आणि त्याच्या इतर 2 साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.
advertisement
हे होतं लुटण्यामागचं कारण
पोलीस चौकशी समोर आलेली बाब अशी की, इस्पुर्लीतील अविनाश मोहिते याने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. पण त्याच्याकडून हप्ते भरणे शक्य झाली नाही. वसुली मॅनेजर सूरज पाटील हे त्याच्या दारात जाऊन हप्त्याची मागणी करत होते. त्यामुळे अविनाश मोहिते याने आपल्या साथीदारांसह लुटण्याचा प्लॅन केल आणि मारहाण करत त्यांना लुटले.
advertisement
हे ही वाचा : 271 कोटींच्या राजकीय निधीचा झोल, मुंबईच्या मोबाईलवर यायचा OTP, त्यानंतर... पक्षाची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 14, 2025 8:43 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
थकले होते कर्जाचे हप्ते, वसुली करणाऱ्याचा आला राग, 4 मित्रांना घेतलं सोबत अन् केला मोठा कांड, कारण ऐकून व्हाल थक्क!









