जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील खामखेडा येथील अनिल फदाट हे भावासाठी मुलगी पाहत होते. त्यांच्या ओळखीतील एकाने मुलगी आहे असे सांगितले होते. त्यानुसार मुलींकडच्यांनी घरी येऊन मुलाला पसंत केले. मुलगी पाहून देतो म्हणून एजंटाने काही रक्कम द्यावी लागेल, लग्न तुम्हालाच लावावे लागेल, असे सांगितले.
13 वर्षांची मुलगी बनली आई, 18 वर्षांचा पती फरार! त्यांच्या लग्नाचं कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का
advertisement
मुलाच्या भावाने अट मान्य करून लग्नास होकार दिला. मुलीचे स्थळ पाहून देणाऱ्याला रक्कमही दिली. खामखेडा गावात 9 मे रोजी रात्री उशिरा लग्न लागले. दुसऱ्या दिवशी मुलीला राजूर येथे दर्शनासाठी घेऊन जायचे म्हणून नवरदेव, नवरी आणि तिची बहीण जात होते. राजूर रोडवर नवरीने थोडं थांबा म्हणून गाडी थांबवली. त्याच गाडीजवळ असलेल्या दुसऱ्या गाडीत नवरी आणि तिची बहीण बसून पसार झाल्या.
नवरी आणि तिची बहीण पळून गेल्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल फदाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रूपाली मंगेश भारती (अमरावती), राणी, कल्याण मजहर कुरेशी (राळेगाव), शेख पाशा शेख पाशू जाफराबाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पैसे घेऊन लग्न लावायचे आणि नंतर पैसे दागिने घेऊन पसार व्हायचे, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. 9 मे रोजी लग्न लागल्यानंतर 10 मे रोजी चारचाकी वाहनाने देवदर्शनाला जात असताना नवरीने एका ठिकाणी गाडी थांबवली. त्यानंतर दुसऱ्या गाडीत बसून नवरी आणि तिची बहीण रोख रक्कम आणि दागिने असा 2 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेल्या. ही घटना राजूर रोडवर घडल्यानंतर या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






