घरी आल्यानंतरही ती सतत इतर मुलांशी फोनवर बोलत असते. तिला हे करण्यापासून थांबवलं की वाद घालते, असंही पतीने सांगितलं. गुरुवारी रात्रीही पत्नी उशिरा घरी पोहोचली आणि अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलू लागली. याबाबत पतीने पत्नीला अडवल्याने पत्नी संतापली. त्यानंतर सकाळी तिने झोपलेल्या पतीवर धारदार शस्त्राने वार करून पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.
advertisement
आभाळातून कोसळला 'मृत्यू'; पावसाला सुरुवात होताच सोलापूरात दोघांनी गमावला जीव
रक्तबंबाळ झालेल्या पतीला आई-वडील आणि बहिणीने रतलामच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, दोघांचं 2020 मध्ये लग्न झालं होतं. त्यांनी दलालाला पैसे देऊन वधू आणली होती. 2 वर्ष सर्व काही सुरळीत चाललं, पण गेल्या 2 वर्षांपासून पत्नीचे घरात वाद होऊ लागले. ती सकाळी बाहेर पडू लागली आणि संध्याकाळी घरी यायला लागली. थांबवल्यावर ती पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करायची.
त्याचबरोबर महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर मारहाण आणि घरातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोपही केला आहे. महिलेलाही रतलामच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिलेचा आरोप आहे, ती झोपली असताना पतीने तिचा गळा दाबला आणि काच लागल्यामुळे तिच्या पतीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली. जखमी पतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करत असलेले डॉक्टर गोपाल यादव सांगतात की, रुग्णाची प्रकृती ठीक आहे. सध्या तो धोक्याबाहेर आहे.