पती-पत्नीचं नातं विश्वासावर आधारलेलं असतं, पण काही लोकं ते तोडण्यासाठी एक क्षणही वाया घालवत नाहीत. अशाच एका पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारे फसवलंय की, त्याला आयुष्यभर याचा पश्चाताप होईल. पत्नीच्या जाळ्यात अडकून, त्याने एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधला आणि जेव्हा त्याला खरेदीदार मिळाला, तेव्हा त्याला त्याच्या किडनीचा एकही रुपयाही मिळाला नाही.
advertisement
पत्नीने पतीची किडनी विकली आणि प्रियकरासोबत पळून गेली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने आपल्या पतीला सांगितलं की, जर त्याने त्याची एक किडनी विकली, तर त्यांना इतके पैसे मिळतील की त्यांच्या घराची परिस्थिती सुधारेल. त्यांची 10 वर्षांची मुलगी मोठी होईल आणि तिचं शिक्षण चांगलं होईल, तसेच तिचं लग्नही चांगलं होईल. पत्नीच्या बोलण्यावर पतीचा विश्वास बसला आणि त्याने एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधण्यात घालवलं. मानवी अवयव विकणं कायद्याचं उल्लंघन असल्यामुळे, त्याची किडनी 3 महिन्यांपूर्वी काळ्या बाजारात विकण्यात आली. त्याला 10 लाख रुपये मिळाले. इतका मोठा त्याग केल्यानंतर आपली फसवणूक होणार आहे, याची त्या व्यक्तीला कल्पनाही नव्हती.
फेसबुकवरील प्रेमाने आयुष्य उद्ध्वस्त केले...
पतीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी बराकपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकराला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती आणि दोघांनी मिळून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले. पतीने पोलिसांच्या मदतीने पत्नीला शोधलं आणि मुलीसोबत तिला परत आणायला गेला. कुटुंब समोर पाहून पत्नीने दरवाजा बंद केला आणि घटस्फोटाची धमकी देऊ लागली. पत्नीने पतीवर त्रास दिल्याचा आरोप करत घटस्फोट मागितला आहे. सध्या, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे.
हे ही वाचा : Online Fraud: "पहिले पैसे द्या, मग पैसे मिळवा", ही स्किम तरुणाला पडली महागात, 52 लाखांना लागला चुना
हे ही वाचा : नाव हरी, पण केला मोठा कांड! पोलीस स्टेशनवरच फेकला बाॅम्ब, प्रकरण ऐकून तुम्हीही व्हाल चकित