नाव हरी, पण केला मोठा कांड! पोलीस स्टेशनवरच फेकला बाॅम्ब, प्रकरण ऐकून तुम्हीही व्हाल चकित

Last Updated:

तमिळनाडूच्या रानीपेटमध्ये पोलिस ठाण्यावर पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी हरीला पोलिसांनी एनकाउंटरमध्ये अटक केली. पोलिसांवर चाकूने हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करताना हरीला गोळी झाडण्यात आली. सध्या तो आणि जखमी पोलीस अधिकारी मुथिस्वरण वेल्लोर सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Local18 Crime
Local18 Crime
गुन्हेगारी क्षेत्रात काही गुन्हे चित्रपटालाही लाजवतील असे असतात. असाच एक गुन्हा तामिळनाडूतील राणीपेट पोलीस स्टेशनसंबंधी घडला. या स्टेशनवर कोणीतरी पेट्रोल बॉम्ब फेकला अन् एकच खळबळ उडाली. या घटनेने पोलीस जागे झाले आणि गुन्हेगारांच्या शोधासाठी दिवसरात्र एक केला. अखेर 10 लोकांनी ताब्यात घेतलं. बरीच चौकशी केल्यानंतर गुन्ह्यामागचा मास्टरमाईंट दुसराच निघाला. त्याचं नाव होतं हरी.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
सिपकोट पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोपी हरी पोलिसांच्या चकमकीत सापडला. पोलिसांच्या सहाय्यक निरीक्षकावर चाकूने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, हरीच्या पायात गोळी लागली आणि तो पकडला गेला. जिल्हा पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला यांच्या आदेशानुसार दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. विशेष पथकाचे पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा कसून तपास करत होते. यादरम्यान, पोलिसांनी त्या भागातील 10 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली.
advertisement
पोलीस कर्मचाऱ्यावर केला चाकूने वार
याशिवाय, सिपकोट पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक मुथिश्वरन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस सतत तपास करत होते. याच दरम्यान, पोलीस कावेरीपक्कमजवळ गस्त घालत होते. तेव्हा पोलिसांनी हरीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हरीने पोलीस सहाय्यक निरीक्षक मुथिश्वरन यांच्यावर चाकूने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर, पोलिसांनी हरीला पळून जात असताना पायात गोळी मारली, तो जखमी झाला त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं. सध्या, हरीच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस सहाय्यक निरीक्षक मुथिश्वरन आणि गोळी लागून जखमी झालेला हरी दोघेही वेल्लोर सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
नाव हरी, पण केला मोठा कांड! पोलीस स्टेशनवरच फेकला बाॅम्ब, प्रकरण ऐकून तुम्हीही व्हाल चकित
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement