पतीने पत्नी आणि मुलांना चार महिन्यांपुर्वी घराबाहेर काढलं होतं. यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत मजा आणि रोमान्स करणा-या पती आणि तिच्या मैत्रिणीला पत्नीने धडा शिकवण्याचं ठरवलं. पत्नीचे भावाच्या मदतीने पती आणि त्याच्या मैत्रिणीला चोप दिला. पत्नी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने पतीच्या मैत्रिणीला घराच्या गेटला दुपारपर्यंत बांधुन ठेवलं. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठलं.
advertisement
या घटनेतील पती हा वडगाव परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहातो. तो उद्योगनगरीतील एका कंपनीत सुपरवायझरचं काम करतो. काही दिवसांपुर्वी त्याची एका महिलेसोबत ओळख झाली होती. यानंतर दोघांची जवळीक वाढल्याने इकडे पती पत्नीचे खटके उडू लागले. पती-पत्नीचा वाद विकापाला गेल्यानंतर तीन महिन्यांपुर्वी पतीने पत्नी आणि दोन मुलांना घराबाहेर काढलं आणि एकटाच राहू लागला.
पत्नी घरातून गेल्यानंतर पतीने त्याच्या मैत्रीणीला घरी आणून ठेवलं होतं. नुकतंच दोन दिवसांपूर्वी पत्नी रांजणगावात आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. बुधवारी ती भावाला सोबत घेऊन सकाळच्या सुमारास आपल्या घरी वडगावात गेली. यावेळी पती आणि त्याची मैत्रीण घरात रोमान्स करत असल्याचं तिला दिसलं. यामुळे संतापून तिने आणि तिच्या भावाने पती आणि त्याच्या मैत्रिणीला चांगलंच चोपलं. महिलेनं पतीची मैत्रीण अनामिका हिचे हायपाय बांधून तिला घराच्या चॅनल गेटला बांधून ठेवलं. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गेटला बांधून ठेवलेल्या महिलेची सुटका केली. यानंतर तिला आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात आणलं. प्रकरणाची एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.