मध्यरात्री लोकांच्या घराची डोअर बेल वाजवायची महिला; मोठ्याने रडायची, सत्य जाणून पोलिसांनाही बसला धक्का

Last Updated:

मध्यरात्री दारावरची बेल वाजल्याने भीतीपोटी लोकांनी दार उघडलं नाही. यानंतर एक महिला रात्री बेल वाजवून घराबाहेर रडत असल्याची अफवा परिसरात पसरली.

डोअर बेल वाजवायची महिला
डोअर बेल वाजवायची महिला
भोपाळ : एका गल्लीत रात्री उशिरा घरांच्या दारावरची बेल वाजवणाऱ्या एका महिलेचं प्रकरण पोलिसांनी उघड केलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही महिला दिसली. या फुटेजच्या आधारे पोलीस महिलेपर्यंत पोहोचले. यानंतर समजलं की ही महिला आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या शोधासाठी येथे आली होती. ही घटना ग्वाल्हेरच्या चंदन नगरमधून समोर आली आहे. ही महिला ग्वाल्हेरची रहिवासी असून तिचा लिव्ह-इन पार्टनर विक्की शाक्य याच्यासोबत आपागंज भागात राहते. विकी शाक्य हा ग्वाल्हेरच्या घास मंडी येथील चंदन नगर येथील रहिवासी आहे.
8 जून रोजी या महिलेचं विकीसोबत भांडण झालं, त्यानंतर तो तिला सोडून गेला. यानंतर ती महिला तिचा लिव्ह इन पार्टनर विकीचा शोध घेण्यासाठी चंदन नगरमध्ये पोहोचली. मात्र तिला विकीचं घर माहित नव्हतं. अशा परिस्थितीत तिने अनेक घरांमध्ये जाऊन बेल वाजवली. मात्र मध्यरात्री दारावरची बेल वाजल्याने भीतीपोटी लोकांनी दार उघडलं नाही. यानंतर एक महिला रात्री बेल वाजवून घराबाहेर रडत असल्याची अफवा परिसरात पसरली. महिला आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर विकी शाक्य यांची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी ही बाब उघड केली.
advertisement
रहिवाशांनी सांगितलं की, 'महिला रात्री बेल वाजवते आणि भितीदायक आवाजात रडते. रात्री नातेवाईक आणि कुटुंबीयांना दार उघडण्याची भीती वाटते. त्यांनी पोलिसांना मदतीची विनंती केली आहे.
ग्वाल्हेरचे सीएसपी अशोक जदौन म्हणाले, ग्वाल्हेर पोलीस स्टेशन हद्दीतील चंदन नगर येथील रहिवाशांनी तक्रार केली होती की, एक महिला रात्री त्यांच्या घराची बेल वाजते आणि रडते आणि त्यांना त्रास देते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेची ओळख पटली. महिलेचं तिच्या प्रियकराशी भांडण झालं. महिलेला प्रियकराचं घर माहीत नसल्याने ती अनोळखी व्यक्तींना त्रास देत होती. रहिवाशांचे जबाब घेण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे कायदेशीर कारवाई केली जात नाही.
मराठी बातम्या/क्राइम/
मध्यरात्री लोकांच्या घराची डोअर बेल वाजवायची महिला; मोठ्याने रडायची, सत्य जाणून पोलिसांनाही बसला धक्का
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement