TRENDING:

100, 200 की 300? रिलीजच्या पहिल्याच दिवशी Pushpa 2 करणार रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई! समोर आला आकडा

Last Updated:

'पुष्पा 2: द रूल' 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. रिलीजच्या आधीच हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित सिक्वेल 'पुष्पा 2: द रूल' 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. रिलीजच्या आधीच हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. पहिल्या दिवशी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 105 कोटी रुपयांची कमाई करू शकतो.
'पुष्पा 2: द रूल' 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. रिलीजच्या आधीच हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.
'पुष्पा 2: द रूल' 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. रिलीजच्या आधीच हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.
advertisement

SACNILC च्या अहवालानुसार, 'पुष्पा 2' भारतात रिलीज होणाऱ्या सर्व भाषांमध्ये 233 कोटी रुपये कमावण्याचा अंदाज आहे. एकट्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यांमध्ये अंदाजे 105 कोटी रुपयांचे योगदान देऊ शकतात. हा चित्रपट कर्नाटकातून 20 कोटी रुपये, तामिळनाडूतून 15 कोटी रुपये आणि केरळमधून 8 कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे.

परदेशात 70 कोटी रुपये कमावेल

advertisement

याव्यतिरिक्त, असा अंदाज आहे की हा चित्रपट उर्वरित भारतातून अंदाजे 85 कोटी रुपयांची कमाई करेल. त्याचवेळी अमेरिकेत या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला अकल्पनीय प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विदेशी बॉक्स ऑफिस कलेक्शन अंदाजे 70 कोटी रुपये असेल. 'पुष्पा 2' ची जगभरातील एकूण कमाई सुमारे 303 कोटी रुपये अपेक्षित आहे.

जेव्हा 'पुष्पाराज' मराठीतून बोलतो... मुंबईत अल्लू अर्जुनचा मराठमोळा ठसका, Viral Video ने धुमाकूळ घातला

advertisement

गुरुवारी प्रदर्शित होणारा एकमेव चित्रपट

'पुष्पा 2: द रूल' च्या रिलीजसाठी गुरुवारची निवड करून, निर्माते सिंगल ओपनिंग डे यशस्वी करण्याचा विचार करत आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सरकारने 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत 600 रुपयांपासून सुरू होणाऱ्या तिकीट दरात वाढ करण्यास परवानगी दिली आहे. काही अंदाजांनुसार, 'पुष्पा 2' हा जगभरातील बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 300 कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरू शकतो.

advertisement

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये किती कमाई झाली?

'पुष्पा 2: द रुल'ची ॲडव्हान्स बुकिंग चित्रपटाच्या रिलीजच्या 6 दिवस आधी म्हणजेच 30 नोव्हेंबरला सुरू झाली आहे. अल्लू अर्जुनचा चित्रपट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये प्रचंड नफा कमावताना दिसत आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरू होऊन केवळ 24 तासांत लाखो तिकिटांची विक्री करून चित्रपटाने 12 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

advertisement

सकनिल्कच्या अहवालानुसार, 'पुष्पा 2: द रुल'ने ॲडव्हान्स बुकिंग सुरू केल्यापासून 24 तासांत 2 लाख 48 हजार 384 तिकिटे विकली आहेत. यासह चित्रपटाने आतापर्यंत 7.49 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्लॉक जागांसह हा आकडा 12.84 कोटी रुपये झाला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
100, 200 की 300? रिलीजच्या पहिल्याच दिवशी Pushpa 2 करणार रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई! समोर आला आकडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल