अभिनेते युसुफ हुसैन यांचा जन्म 21 जानेवारी 1948 मध्ये झाला. त्यांना त्यांच्या नशीबानेच या मोठ्या पडद्यावर आणले होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांची 'ओ माय गॉड' या चित्रपटातील जजची भूमिका, शाहरुखच्या 'रईस' फिल्म मधील भूमिका असेल किंवा 'धूम 2' मध्ये ऋतिक रोशन सोबतचा सीन असेल. या सर्व फिल्ममधून त्यांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते.
advertisement
व्यवसाय ते अभिनय असा प्रवास
'सीआईडी' मालिकेच्या कित्येक भागांमधून अभिनेते युसुफ हुसैन हे वेगवेगळ्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर कुमकुम, प्यारा सा बंधन सारख्या हिंदी मालिके मधून ते घराघरात पोहोचले. त्यांचा आवाज, संवाद फेक आणि हावभाव एवढे नैसर्गिक होते की प्रेक्षकांना त्यांची भूमिका लक्षात राहायची आणि खूप आवडायची. त्यांचा लखनऊ मध्ये कपड्यांचा व्यवसाय होता. पण त्यांचा कधी थिएटरसोबत संबंध आला नव्हता. त्यांनी कधीच थिएटर अभिनय केला नाही. त्यांना जेव्हा एक चांगली संधी मिळाली तेव्हा त्यांनी संधीचा फायदा घेऊन स्वतःतील अभिनयाच्या कौशल्याला वाव दिला.
पैशांमुळे फिल्म अडकली होती
अभिनेते युसुफ हुसैन यांचे जावई हंसल मेहता यांची एक 'शाहिद' नावाची फिल्म होती. ती फिल्म वकील आणि कार्यकर्ता शाहिद आजमी यांच्या जीवनावर आधारीत होती. त्या फिल्मचे सुरुवातीचे शेड्यूल कसेबसे पूर्ण केले होते, पण त्यानंतर ती फिल्म पैशाअभावी अडकली. त्यांचा तो सगळ्यात कठीण काळ होता. त्यांना वाटले होते की आपले करियर संपले.
जावयाची मदत
अभिनेते युसुफ हुसैन यांना आपल्या जावयाची ही घालमेल पाहवत नाव्हती. त्यांनी जावयाकडे जाऊन सांगितले की, "माझ्याकडे एक फिक्स डिपॉझिट आहे, जे माझ्या काही कामाचे नाही. त्याचा वापर तुम्ही करा." त्यानंतर त्यांनी एक चेक त्यांना दिला. त्या पैशात त्यांनी फिल्मची पूर्ण शूटींग केली. या फिल्मसाठी हंसल मेहता यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 30 ऑक्टोबर 2021 ला युसुफ हुसैन यांचे निधन झाले होते. त्यावर मेहता यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
