ती नायिका म्हणजे श्रीदेवी तिची त्याकाळात एक स्पर्धक अभिनेत्री होती ती म्हणजे जया प्रदा. ही अभिनेत्री मुळची आंध्र प्रदेश, राजमुंदरी मधील राहणारी आहे. लहाणपणीचे तिचे नाव होते ललिता राणी राव, ती पुढे जया प्रदा या नावाने ओळखली गेली. ती ही 70-80 च्या दशकात सगळ्यात जास्त कमवणारी अभिनेत्री होती.
'ठरलं तर मग'ला मिळाली नवी पूर्णा आजी, ज्योती चांदेकरांच्या जागी रोहिणी हट्टंगडी, फर्स्ट लुक
advertisement
तेलुगु फिल्म मधून डेब्यू
मोठ्या पडद्यावर तिने 1974 मध्ये तेलुगु फिल्म 'भूमी कोसम' या मधून तिने आपल्या करियरची सुरुवात केली होती. कोसम मधील तिच्या डान्सने तर सगळ्यांना प्रेमात पाडले होते. त्या तीन मिनिटांच्या डान्सने मनाला भूरळ पाडली होती.
जयाचे मानधन
एकवेळ जयाला फक्त दहा रुपये मानधन दिले गेले. तो तिच्या करियरचा टर्निंग पॅाइंट ठरला. तिने जितेंद्र सोबत अनेक हिट फिल्म दिल्या होत्या.
श्रीदेवीसोबतचा रुसवा
जया आणि श्रीदेवी यांच्यातील मौन चर्चेत होतं. एका रिपोर्टनुसार, दोघी अनेक वर्ष एकमेकांशी बोलल्याही नाहीत. जेव्हा दोघी एकाच सिनेमात काम करत होत्या, तेव्हा शूट झाल्यावर आपआपल्या दिलेल्या जागी बसायच्या. त्या एकमेकांशी अजिबात बोलायच्या नाहीत.
राजकारणात सक्रीय होत्या
जया ही एक चांगली अभिनेत्री होती. तिने राजकारणातही आपले चांगले स्थान निर्माण केले होते. तिने सरगम, मां, घर-घर की कहानी, तूफान, सिंदूर, गंगा तेरे देश में अशा सिनेमात काम केले होते. त्यानंतर ती प्रोड्यूसर श्राकांत नहाटा यांच्या प्रेमात पडली.
इनकम टॅक्स रेड
जयाच्या आयुष्यात एक वाईट काळ आला, तो म्हणजे तिच्या घरावर इनकम टॅक्स रेड पडली होती. तिचे सिनेमातील करियर धोक्यात आले होते. तरीही श्रीकांत सोबत तिचे प्रेम वाढत गेले.
जयाचे लग्न
श्रीकांत आणि जया प्रदानने 1986 मध्ये गुपचूप लग्न केले. श्रीकांतचे अगोदर एक लग्न झाले होते. त्यांच्या पत्नीने कधी त्यांच्या लग्नाला विरोध केला नाही. त्यानंतर जयाचे करियर संपत आले. तिने आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले आणि मोठं केले.