तिसरी घंटा, पुन्हा एकदा या उपक्रमामुळे मराठी रंगभूमीला नवं डिजिटल व्यासपीठ मिळालं आहे. त्यामुळे नाटकप्रेमींसाठी हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे. आजच्या डिजिटल युगात प्रेक्षकांची पसंती OTT प्लॅटफॉर्मकडे वाढत चालली आहे. त्यामुळे रंगभूमीवरील गाजलेली नाटके घरबसल्या पाहण्याची ही उत्तम संधी आहे. थिएटरमध्ये जाऊन नाटक पाहण्याचा अनुभव जरी वेगळा असला तरी या माध्यमातून जुन्या आणि नव्या पिढीला नाटकांचा वारसा अनुभवता येणार आहे.
advertisement
मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आता डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तिसरी घंटा, पुन्हा एकदा' या खास उपक्रमांतर्गत आता गाजलेली मराठी नाटके OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी मिळणार आहे. 27 मार्चपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर हा खास नाट्यसंग्रह उपलब्ध झाला आहे.
मराठी नाटकांची परंपरा जपणारा हा उपक्रम प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. 'श्रीमंत दामोदर पंत' पासून 'यदा कदाचित' पर्यंत आणि 'जाऊ बाई जोरात' पासून 'धुमशान' पर्यंत विविध शैलीतील नाटके एका प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत. कॉमेडी, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यंग अशा विविध अंगांनी सजलेली ही नाटके प्रेक्षकांना पुन्हा एकदा रंगभूमीचा अनुभव देणार आहेत.
या OTT प्लॅटफॉर्मवर तब्बल 75 हून अधिक मराठी नाटकांचा खजिना उपलब्ध आहे. यामध्ये 'बुवा तिथे बाया', 'गोपाळा रे गोपाळा', 'फादर माझा गॉडफादर' यांसारखी गाजलेली नाटके पाहायला मिळणार आहेत. तसेच 'नवरा म्हणू नये आपला', 'चोर चोर चाळीत चोर' आणि 'धुमशान' ही खिळवून ठेवणारी नाटकं देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
