काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक बातमी आली. अजितदादा मुंबईहून बारामतीकडे विमानाने प्रवास करत असताना, लँडिंगच्या काही मिनिटे आधी तांत्रिक बिघाडामुळे विमान बारामतीजवळील एका शेतात कोसळले. विमानाचा भीषण स्फोट झाला आणि या अपघातात महाराष्ट्राने आपला एक रुबाबदार आणि रोखठोक नेता गमावला. या बातमीने केवळ राजकारणच नाही, तर सामान्य जनताही सुन्न झाली.
advertisement
अजित दादांच्या निधनानंतर सुन्न झाला सूरज
सूरज चव्हाणसाठी अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते, तर तो त्यांना आपला देव मानत असे. दादांच्या निधनानंतर सूरजने सोशल मीडियावर आपली वेदना मांडली होती. तो म्हणाला, "मित्रांनो, आज माझा देव चोरला गेला. मला विश्वासच बसत नाहीये की आपले लाडके दादा आता आपल्यात नाहीत. माझ्यासारख्या एका गरीब मुलाला ज्याने सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझी काळजी घेतली आणि मला नवीन आयुष्य मिळवून दिलं, तो माणूस असा सोडून जाईल असं वाटलं नव्हतं. माझ्या आई-वडिलांनंतर जर कोणी माझ्यासाठी इतकं केलं असेल, तर ते अजितदादांनी!" इतकंच नाही, तर त्याने अजित पवार यांच्या अंत्यविधींनाही हजेरी लावून त्यांचे अखेरचे दर्शन घेतले होते.
सूरजने नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर केली असून, त्यात तो दादांच्या फोटोसमोर नतमस्तक होताना दिसत आहे. "दादा, तुमची खूप आठवण येतेय," हे त्याचे शब्द वाचून त्याच्या चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याला दिला होता आधार
सूरज चव्हाण जेव्हा बिग बॉस जिंकून बाहेर आला, तेव्हा त्याच्याकडे स्वतःचं हक्काचं घर नव्हतं. ही बाब समजताच अजितदादांनी तातडीने हालचाली करून सूरजला एक सुंदर घर बांधून दिलं. सूरजच्या करिअरची आणि आरोग्याचीही त्यांनी विचारपूस केली होती. त्यामुळेच दादांच्या अंत्यविधीला सूरज हजर राहिला तेव्हा त्याचं रडणं थांबत नव्हतं. आपल्या पाठीशी असलेला हिमालयासारखा आधार निखळल्याची भावना सूरजच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
