नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ शेअर करत आपल्या डेस्टिनेशन वेडिंगची झलक चाहत्यांना दिली. अथांग समुद्राच्या साक्षीने, स्वच्छ निळ्या आकाशाखाली निरंजन आणि मनीषा गुरम यांनी एकमेकांना वरमाला घालत लग्नगाठ बांधली.
लंच डेट, सीक्रेट ट्रिप्स, अशी सुरु झाली नागा-शोभिताची Love Story!
निरंजनची नववधू मनीषा गुरम ही व्यावसायिक न्यूट्रिशनिस्ट आहे. फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइल टिप्ससाठी ती ओळखली जाते. रिसेप्शनसाठी या नवविवाहित जोडप्याने खास इंडो-वेस्टर्न लूक केला. काळ्या रंगाच्या क्लासिक सूटमधील निरंजन आणि डिझायनर गाऊनमधील मनीषाचं सौंदर्य पाहून सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. त्यांच्या या खास क्षणाला अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या.
advertisement
दरम्यान, निरंजन 'जावई विकत घेणे आहे', 'सोल-कढी', 'एक थ्रिलर नाईट' अशा वेगवेगळ्या मालिकांमध्ये आणि चित्रपटांत दिसला आहे. अभिनयासोबतच त्याने ठाण्यात एक हॉटेल सुरू करून व्यवसायिक क्षेत्रातही पाऊल ठेवलंय.