'आई कुठे काय करते' फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेनेही दिवाळीच्या मुहूर्तावर नवी खरेदी केली आहे. तिने आलिशान कार घेतली आहे. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गायक महेश काळेंचं वेगळंच रुप, लोक पुन्हा पुन्हा पाहतायेत हा VIDEO, विश्वासच बसत नाहीये!
रुपाली भोसलेने घेतली नवी कार
रुपाली भोसलेने नवी कार खरेदी केल्याची माहिती तिच्या इन्स्टाग्रामवरून दिली. तिने व्हिडिओ शेअर करत तिच्या नव्या कारची झलक शेअर केली. कुटुंबासोबत जाऊन अभिनेत्रीने कार घेतली. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने म्हटलं 'वेलकम होम'. चाहते रुपालीला कार घेतल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहेत. अनेक कलाकारांनीही कमेंट केल्या.
advertisement
दरम्यान, रुपाली भोसले वेगवेगळ्या मालिकांमध्ये झळकली आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाच्या भूमिकेनं तिला खूप प्रसिद्धी दिली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. रुपाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांशी कनेक्ट असते. तिच्याविषयीच्या नवनवीन अपडेट्स ती शेअर करत असते.