TRENDING:

Rupali Bhosle Car Accident : अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा अपघात, नव्या कोऱ्या मर्सिडीज बेन्झची झालीये अशी अवस्था, PHOTO

Last Updated:

Rupali Bhosle Car Accident : अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा अपघात झाला आहे. काही महिन्यांआधीच तिने नवी कार खरेदी केली होती. अपघाताचे फोटो तिने शेअर केलेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आई कुठे काय करते या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या लपंडाव या मालिकेत दिसतेय. मालिकेत तिनं सरकार ही खलनायिकेची भूमिका साकारली आहे. रुपाली भोसलेच्या बाबतीत नुकतीच एक वाईट घडना घडली आहे. रुपालीच्या कारचा अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे रुपालीने काही दिवसांआधीच तिची नवी कार खरेदी केली होती. तिच्या नव्या कोऱ्या कारचा अपघात झाला असून तिने व्हिडीओ शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.
News18
News18
advertisement

रुपाली भोसलेनं जानेवारी महिन्यात तिची नवी मर्सिडिज बेन्झ ही कार घरेदी केली होती. कार घेण्याच्या काही दिवस आधी तिने तिच्या नव्या घरात प्रवेश केला होता. आधी घर नंतर नवी कार घेऊन रुपालीने तिचा आनंद सगळ्या चाहत्यांबरोबर शेअर केला होता. रुपालीच्या त्यात मर्सिडिज बेन्झ कारचा अपघात झाला.

( 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारला मराठी फिल्म करताना आला भयानक अनुभव )

advertisement

रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कारच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. अपघातात कारचं बोनेट डॅमेज झालं आहे. रुपालीच्या कारचा अपघात कसा झाला याची माहिती समोर आलेली नाहीये. अॅक्सिटेन्ट झाला, वाईट दिवस, असं कॅप्शन देत रुपालीने व्हिडीओ शेअर केला आहे.

advertisement

रुपालीने कार खरेदी केली तेव्हा ती प्रचंड आनंदात होती. तिने खास कॅप्शन लिहित कारचे फोटो शेअर केले होते. तिने पोस्टमध्ये लिहिलेलं, एक दिवस मी तुझी मालकीण होईन यासाठी हे सर्व सुरू झालं. तुम्ही आयुष्यात फक्त स्वप्न पाहू नका. ती स्वप्न जगा, त्या स्वप्नांवर प्रेम करा आणि रिस्क घ्या.   कितीही कठीण असलं तरी स्वतःला प्रॉमिस करा. तुमची स्वप्न सोडू नका. तुम्ही काय करू शकत नाही हे सांगू नका तर तुम्ही काय करू शकता हे सांगा. वेलकम बेबी, चल आता पुढे एकत्र प्रगती करत जाऊ.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rupali Bhosle Car Accident : अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कारचा अपघात, नव्या कोऱ्या मर्सिडीज बेन्झची झालीये अशी अवस्था, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल