टेलिव्हिजनवर अशा फार कमी मालिका आहेत ज्या अनेक वर्ष सुरू राहतात. आई कुठे काय करते ही मालिका त्यापैकी एक आहे. मालिकेची कथा अरूंधती या पात्राभोवती फिरणारी आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली आहे. आई कुठे काय करते ही मालिका अनुपमा या हिंदी मालिकेचा रिमेक आहे.
आई कुछे काय करते ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 स्टार प्रवाह या वाहिनीवर टेलिकास्ट होते. 23 डिसेंबर 2019 या दिवशी ही मालिका टेलिव्हिजनवर सुरू झाली. मागील 5 वर्ष ही मालिका टेलिव्हिजनवर पाहायला मिळतेय आणि मालिकेनं नुकतेच 1200 एपिसोड पूर्ण केले. आजवर मालिकेत अनेक नवीन कलाकार आले. पण काही कलाकार आजही मालिकेत पाहायला मिळतात. त्यातील एक म्हणजे मालिकेतील अनघा. अभिनेत्री अश्विनी महांगडे, संजना म्हणजे रूपाली भोसले, अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंग गवळी, मालिकेतील यश, अभि, इशा आणि आई आप्पा या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
advertisement
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेचे 1200 एपिसोड पूर्ण झाल्याची माहिती दिली. मालिकेतील कलाकारांनी 1200 एपिसोड पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला.