TRENDING:

'आई कुठे काय करते' मालिका अखेर Off Air! प्रेक्षकांना निरोप देताना कलाकार भावुक, शेअर केली खास पोस्ट

Last Updated:

'आई कुठे काय करते' ही मालिका केवळ प्रेक्षकांच्याच नाही, तर त्यातील कलाकारांच्याही मनाच्या जवळची होती. म्हणूनच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गेली ५ वर्षे 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सामान्य गृहिणी आणि आई आपल्या कुटुंबासाठी काय करू शकते, हे मालिकेने दाखवून दिलं. केवळ अरुंधतीच नाही, तर मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. अखेर पाच वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका केवळ प्रेक्षकांच्याच नाही, तर त्यातील कलाकारांच्याही मनाच्या जवळची होती. म्हणूनच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यानंतर मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते काय म्हणाले पाहूयात.
'आई कुठे काय करते' ही मालिका केवळ प्रेक्षकांच्याच नाही, तर त्यातील कलाकारांच्याही मनाच्या जवळची होती. म्हणूनच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
'आई कुठे काय करते' ही मालिका केवळ प्रेक्षकांच्याच नाही, तर त्यातील कलाकारांच्याही मनाच्या जवळची होती. म्हणूनच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement

मालिकेची प्रमुख कलाकार मधुराणी प्रभुलकर, म्हणजेच अरुंधती म्हणाली, "'आई कुठे काय करते'चा प्रवास आज थांबला… पण तो संपला नाही… कारण आई हे तत्व आहे….. ते कसं संपेल… तो अनेक वर्षं असंख्य जणांच्या मनात घर करून राहणार आहे. मायबाप प्रेक्षकांचे आणि त्या विधात्याचे संपूर्ण टीम कडून मी पुन्हा एकदा आभार मानते….!!!"

advertisement

तर सर्वांचाच लाडका 'यश' म्हणतो, "Good bye यश अरूंधती देशमुख.. PACK UP! ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं, 5 वर्षांपासून सोबत असलेलं “कुणीतरी”आता कधीच नसेल किंवा असेल ह्यातली घालमेल घरी येईपर्यंत होती..निघताना भेटीगाठी झाल्या,आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं..कुणाला तरी भेटायचं राहीलंय असं वाटतच होतं..शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो,मेक अप रूम मधे, आरशात बघून आलो..पहिल्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो..बॅग जराशी जड वाटत होती..निरोप घेताना ‘मी’ समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की ‘तो’माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक!! त्याच्याकडे पाठ करून निघावसं वाटत नव्हतं.. “मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार..त्यात काय एवढं? ते फक्त काम आहे..” असं शहाण्यांना वाटत असेल..पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं..!"

advertisement

'ईशा' म्हणाली, "खूप प्रेम खूप gratitude. ५ वर्ष! इशा, आई कुठे काय करते, अचानक आले आणि आयुष्य बदलून गेले. खूप शिकले. पडले, रडले, उठले, सावरलं.. आता पुढची वाटचाल सुरू. खूप लोकांना thank you म्हणायचं आहे.. ५ वर्षांत इतकी नाती जोडल्या गेली की आपल्या माणसांचे आभार मानून परक करायचं नाहीये...भावना खूप आणि शब्द कमी असं झालंय. पुढेही मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करेन हे promise."

'अनिरुद्ध'ची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी म्हणाले, "आज 'आई कुठे काय करते' या मालिकेचा प्रवास संपला, migratory birds सारखे सगळे उडून गेले, पुन्हा एकत्र येतील की नाही माहित नाही, "लगान" ची टीम पुन्हा तयार होत नसते, आता फक्त मागे आठवणी ठेवून, सगळे आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले, "आई कुठे काय करते" या मालिकेने सगळ्यांनाच भरभरून दिल, माझ्यासाठी राजन शाही, नमिता वर्तक, डी के पी परिवार, सतीश राजवाडे आणि स्टार प्रवाह परिवार यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, सातत्याने सांभाळून घेतलं, प्रोत्साहन दिलं, आधार दिला, इतक्या लांबचा प्रवास गाठण्यासाठी ताकद दिली, त्यांचा मी ऋणी आहे. माझ्या अफलातून सहकलाकारांचा आणि संपूर्ण "आई कुठे काय करते" च्या टीमचा खूप खूप आभारी आहे."

तर 'अनघा' म्हणते, "#अनघा या व्यक्तीरेखेचा प्रवास संपला. या प्रवासात मी घडले. #समृध्दी ने अधिक समृध्द केले. या प्रवासात सोबत असणारी सगळीच माणसं फार महत्त्वाची आहेत. कधी कधी आलेले एकटेपण सुद्धा सोबतच्या माणसांनी वाटून घेतले."

'अनिश' हे पात्र साकारणारा सुमंत ठाकरे म्हणाला, "पहिली नेहमी खास असते! आज आई कुठे काय करते मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. हे थोडं अस्वस्थ करणारं आहे पण हा प्रवास समृद्ध करणारा आहे. कधी कधी संधी विचित्र मार्गाने येते, तो मार्ग जितका विचित्र तितकाच ती स्वीकारल्यावरचा प्रवास सुखद, असं माझं मत आहे."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

अभिनेता निरंजन कुलकर्णी म्हणजेच 'अभी' म्हणतो, "wrap up! आई कुठे काय करते मालिकेचा सेट आणि आमचा समृद्धी बंगला. या बंगल्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात आमच्या आठवणी आहेत आणि आमच्या बरोबरच प्रेक्षकांच्या सुद्धा अनेक आठवणी या समृद्धी बंगल्याने जपून ठेवल्या आहेत. आमच्याबरोबर आमचे मायबाप प्रेक्षकही या बंगल्यात राहत होते. या वास्तूला आमचं शेवटचं नमन. या पुढे इथे घडणाऱ्या कलाकृती,मालिका उत्तरोत्तर प्रगती करो हीच शुभेच्छा. वास्तु नेहमी तथास्तु म्हणते. !!श्री स्वामी समर्थ!!"

मराठी बातम्या/मनोरंजन/
'आई कुठे काय करते' मालिका अखेर Off Air! प्रेक्षकांना निरोप देताना कलाकार भावुक, शेअर केली खास पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल