नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची १७ नोव्हेंबर २०२५ ही शेवटची तारीख आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असताना शुक्रवारी बिचुकले यांनी सातारच्या नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. साताऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
साताऱ्यामध्ये मागील २५ वर्षापासून रस्त्यांची चाळण, त्यावर पडलेले खड्डे, बागांची दुरावस्था असे सगळे मी पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्या शाळेत शिकले त्या प्रतापसिंह हायस्कूलचे राष्ट्रीय स्मारक मला बनवायचे आहे. त्याचबरोबर शहराचा सर्वांगीण विकास करून साताऱ्याला सितारा बनवणार असल्याने जनतेने मला साथ द्यावी, मला नगराध्यक्ष करावे, असे आवाहन बिचुकले यांनी केले आहे.
advertisement
२ डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान
राज्यातील सर्वच नगर परिषद आणि नगर पंचायतीची विहित मुदत संपुष्टात आली होती. आधी ओबीसी आरक्षण आणि नंतर काही तांत्रिक कारणाने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुका रखडलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्ग मोकळा झालेला असून पहिल्या टप्प्यांत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणूक होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम कसा असणार?
-अर्ज दाखल करण्याची तारीख -१० नोव्हेंबर २०२५
-अर्ज दाखल अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
-छाननीची तारीख-१८नोव्हेंबर २०२५
-माघार घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५
-अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत- २५ नोव्हेंबर २०२५
-निवडणूक चिन्ह आणि अंतिम यादी- २६ नोव्हेंबर २०२५
-मतदानाचा दिवस -२ डिसेंबर २०२५
