पुन्हा पोस्टमॉर्टम होणार!
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, जुबिन गर्गच्या मृत्यूची योग्य चौकशी करण्यासाठी आणि संशय दूर करण्यासाठी त्याच्या पार्थिवाचं पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात येईल. हे पोस्टमॉर्टम उद्या सकाळी ७:३० वाजता एम्स गुवाहाटी येथील डॉक्टरांची टीम करेल. मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही कोणतीही गोष्ट अस्पष्ट ठेवू इच्छित नाही, म्हणूनच हे पाऊल उचललं आहे. जुबिन गर्ग फक्त आसामचा नाही, तर संपूर्ण देशाचा सुपरस्टार होता.”
advertisement
स्मारक बांधण्याची तयारी सुरू!
जुबिनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आसाममध्ये तयारी सुरू झाली आहे. जुबिनच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार सोनपूरच्या कमरकची गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्याच ठिकाणी आसाम सरकारने १० बिघा जमीन त्याच्या स्मारकासाठी घेतली आहे.
मंत्री केशब महंता म्हणाले, “जुबिन गर्गच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार, आम्ही याच ठिकाणी त्याचं स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तो खूपच लोकप्रिय कलाकार होता, त्यामुळे फक्त आसाममधूनच नाही, तर देशभरातून लोक त्याला श्रद्धांजली देण्यासाठी येत आहेत.”
पुन्हा पोस्टमॉर्टम झाल्यानंतर जुबिन गर्गचा पार्थिव सर्वांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील.