TRENDING:

Akshay Kumar: मोठी बातमी, अक्षयकुमारच्या ताफ्यातील इनोव्हाने रिक्षाला उडवलं, घटनास्थळाचा VIDEO

Last Updated:

इनोव्हाच्या धडकेमुळे रिक्षाचं प्रचंड नुकसान झालं आहे. रिक्षाचं छत पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाला अपघात घाल्याची घटना समोर आली आहे. सिनेमाचं शुटिंग संपवून अक्षय कुमार घरी चालला होता. त्या दरम्यान, अक्षय कुमारच्या ताफ्यातील एका सुरक्षारक्षकांची इनोव्हा कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे. रिक्षाचालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघातात कुणालाही मोठी दुखापत झाली नाही.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जुहू गांधीग्राम रोडवर ही घटना घडली आहे. अभिनेताा अक्षय कुमार शुटिंग संपवून परत येत होता. अक्षय आपल्या मर्सिडीज कारमध्ये बसलेले होता. त्याच्यासमोर एक सुरक्षारक्षकांची इनोव्हा एमपीव्ही गाडी होती. अचानक सुरक्षारक्षकांच्या इनोव्हाने एका रिक्षाला धडक दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

अक्षय कुमारने गाडी थांबवली. सुरक्षारकक्षाच्या इनोव्हाच्या धडकेमध्ये रिक्षाचालकाला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. याा अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अपघातानंतर इनोव्हा पलटी झाली आहे. इनोव्हाच्या धडकेमुळे रिक्षाचं प्रचंड नुकसान झालं आहे. रिक्षाचं छत पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे.

advertisement

तातडीने या रिक्षाचालकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वत: अक्षयकुमारने रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात सुरक्षारक्षकांच्या इनोव्हा आणि रिक्षाचंं नुकसान झालं आहे. सुदैवाने याा अपघातात कुणालाही गंभीर अशी दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली होती.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Akshay Kumar: मोठी बातमी, अक्षयकुमारच्या ताफ्यातील इनोव्हाने रिक्षाला उडवलं, घटनास्थळाचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल