फोटोंमध्ये विशाल, धनशिका आणि त्यांचे कुटुंबीय दिसत आहेत. साध्या पण देखण्या अंदाजात झालेला हा सोहळा अगदी घरगुती वातावरणात पार पडला. विशालने त्याच्या अंगठीचा फोटो शेअर करत “जगभरातून मिळणाऱ्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. सईसोबत माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात करताना खूप आनंदी आहे” असं लिहिलं.
गणेशोत्सवात हृताच्या घरी दुहेरी आनंद, घरी आली नवी पाहुणी; फोटो शेअर करत दिली GOOD News!
advertisement
15 वर्षांची मैत्री ते जीवनसाथी
धनशिकाने पूर्वी सांगितलं होतं की ती विशालला 15 वर्षांपासून ओळखते. कठीण प्रसंगात विशाल नेहमी तिच्या सोबत होता. म्हणूनच तो तिच्यासाठी केवळ मित्र नव्हता, तर आधार होता. विशालदेखील भावूक होऊन म्हणाला होता, “सई मला जीवनसाथी म्हणून मिळाली, हे माझं भाग्य आहे. देवाचे आभार मानतो.”
विशाल हा धनशिकापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. पण त्यांचे फोटो पाहून स्पष्ट होते की या जोडप्याच्या नात्यात फक्त प्रेम आणि समजूतदारपणा आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. साखरपुड्यानंतर आता सगळ्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण सोहळा अगदी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती समोर आली आहे.