TRENDING:

राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा आदिनाथ कोठारेचा 'पाणी' थिएटरमध्ये, प्रियांका चोप्राशी आहे खास कनेक्शन

Last Updated:

आदिनाथ कोठारेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा 'पाणी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राशी देखील खास कनेक्शन समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : दिग्दर्शक निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यानं अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केलेलेल्या आदिनाथनं थेट राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. आदिनाथनं वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयाबरोबर दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केलं. आदिनाथच्या पहिल्याच दिग्दर्शनासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. आदिनाथचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा 'पाणी' हा सिनेमा अखेर रिलीज होणार आहे. आदिनाथनं नुकतीच सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाचं देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राशी देखील खास कनेक्शन समोर आलं आहे.
आदिनाथ कोठारे
आदिनाथ कोठारे
advertisement

'पाणी' या सिनेमातून आदिनाथ कोठारे यानं दिग्दर्शनात पदार्पण केलं. आदिनाथला या सिनेमासाठी 'पर्यावरण संरक्षण/संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म'साठी '66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' देण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर हा सिनेमा रिलीज कधी होईल याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर 18 ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

( Shreyas Talpade Death Rumors : "मी जिवंत आहे..."; निधनाच्या अफवांवर श्रेयस तळपदेची संतप्त प्रतिक्रिया )

advertisement

'पाणी' या सिनेमात आदिनाथ कोठारेबरोबर रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील हे कलाकारही महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहेत.

या सिनेमाशी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचं खास कनेक्शन आहे. प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या सिनेमाचे निर्माते आहेत. त्याचप्रमाणे राजश्री एंटरटेन्मेट यांनीही सिनेमाची निर्मिती केली आहे. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

अभिनेता आदिनाथ कोठारेच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास त्याचा 'द रॉयल्स' हा प्रोजेक्ट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. तसंच त्याचा 'शक्तिमान' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'चंद्रमुखी' सिनेमामुळे आदिनाथ प्रचंड चर्चेत आला होता. त्यानं साकारलेल्या 'दौलतराव' या भुमिकेचं खूप कौतुक झालं होतं. त्याचप्रमाणे आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे 'झपाटलेला 3' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ज्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा आदिनाथ कोठारेचा 'पाणी' थिएटरमध्ये, प्रियांका चोप्राशी आहे खास कनेक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल