2020 मध्ये आदित्यने 10.5 कोटी रुपयांचा 5 बीएचके आलिशान बंगला खरेदी केला. लोकांना वाटलं की हे वडिलांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं. पण आदित्य म्हणतो, "हे घर मी स्वतःच्या कष्टाने खरेदी केलं. वडिलांकडून एक रुपयाही घेतला नाही. खूप वर्षं मेहनत करून हे स्वप्न पूर्ण केलं." आदित्यने भारती सिंग आणि हर्ष लिबांचियाच्या यूट्यूब चैनलला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला.
advertisement
'अय्य भाई, भाषा सांभाळ" शिव्या देणाऱ्यावर संतापली जुईली जोगळेकर, म्हणाली 'असली थिल्लरगिरी..'
आदित्य सांगतो की लोक नेहमीच गृहीत धरतात की स्टारचा मुलगा असल्याने सगळं मिळतं. पण प्रत्यक्षात त्याला सतत स्वतःला सिद्ध करावं लागलं. आज लोक त्याला उदित नारायणचा मुलगा म्हणून नव्हे तर स्वतःच्या कामासाठी ओळखतात, हेच त्याचं मोठं यश आहे.
आदित्यने सांगितलं, त्याचे वडील खूप कडक होते. तो म्हणाला, "मी 18 वर्षांचा होईपर्यंत बाबा मला शिस्त लावत होते. मला मारायचेही. त्या काळात हे सामान्य मानलं जायचं. आमच्या मित्रांमध्ये चर्चा व्हायची, कोणाला किती मार पडला. बाबा मला खूप प्रेम करायचे, पण त्याचबरोबर खूप कठोर होते." आदित्य पुढे म्हणाला, "आजकालच्या काळात मुलांवर हात उचलणं स्वीकारलं जात नाही. काळ बदलला आहे. पण माझ्या बाबतीत त्या शिस्तीने मला मजबूत केलं. आज मी जे काही आहे, ते त्या कडकपणामुळेच."
आज आदित्य नारायण गायक, अभिनेता आणि टीव्ही होस्ट म्हणून लोकांच्या पसंतीस उतरला आहे. तो स्वतःच्या कामगिरीवर लोकांचं प्रेम मिळवत आहे, आणि हीच त्याची खरी कमाई आहे.