Juilee Joglekar: 'अय्य भाई, भाषा सांभाळ" शिव्या देणाऱ्यावर संतापली जुईली जोगळेकर, म्हणाली 'असली थिल्लरगिरी..'

Last Updated:

Juilee Joglekar: नवरात्राच्या उत्सवात धार्मिक आणि लोकनृत्याचे सादरीकरण भरभरुन पाहायला मिळते. मात्र शिवीगाळ करणाऱ्यावर गायिका जुईली जोगळेकर प्रचंड भडकली आणि थेट कडक शब्दात उत्तर दिलं.

शिव्या देणाऱ्यावर संतापली जुईली जोगळेकर
शिव्या देणाऱ्यावर संतापली जुईली जोगळेकर
मुंबई : नवरात्राच्या उत्सवात धार्मिक आणि लोकनृत्याचे सादरीकरण भरभरुन पाहायला मिळते. याच उत्सवात अभिनेत्री मिताली मयेकर, गायिका जुईली जोगळेकर आणि नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांनी ‘जागरण/गोंधळा’ या पारंपरिक गाण्यावर एक डान्स केला. हे सादरीकरण रसिकांना भावले आणि अनेकांनी कौतुक केले. मात्र त्याच पोस्टवर एका नेटकऱ्याच्या अपशब्दांनी आणि शिवीगाळ केला. ज्यामुळे गायिका जुईली जोगळेकर प्रचंड भडकली आणि थेट कडक शब्दात उत्तर दिलं.
गायिका जुईलीने त्या अपमानास्पद कमेंटचा स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. जुईलीच्या पोस्टवर एका व्यक्तीने कमेंट करत लिहिलं होतं, "सगळे छXXX भरती झालेत गाण्यांमध्ये. देवाच्या गाण्याचा मजाक बनून ठेवलाय तुम्ही माXXXX" या अश्लील कमेंटवर जुईली संतापली आणि तिनेही कमेंमध्येच त्याला झापलं.
advertisement
जुईलीने या अश्लील कमेंटवर उत्तर देत लिहिलं, "अय्य भाई! भाषा सांभाळ! तुला नाही बघायचंय तर नको बघू… स्क्रोल डाऊन कर. तुला जे काही बोलायचंय ना ते तू पर्सनली मॅसेज करून पण बोलू शकतोस. इथे भक्तीने आणि श्रद्धेने काम केलं आहे. तुमच्यासारखे नल्ले लोक इथे आई अंबाबाईच्या गाण्यावर शिव्या घालत असतील तर ते चालणार नाही. आम्ही आमचं काम कष्ट करून आणि मजा घेऊन करतो. नाचू वाटले तर नाचतो कारण आम्ही क्रिएट केलं आहे ते. आम्ही ते गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यातही खूप कष्ट आहेत".
advertisement
पुढे जुईली म्हणाली, “तुम्हाला तोंडाला काहीही येईल ते बोलण्यासाठी इथे अंगण दिलेले नाही. काम नसतील तर काम कर. आईचा आशीर्वाद मिळेल. तेव्हाच कलेची कदर करशील, आम्ही कलाकार आहोत. आई सरस्वतीचा हात आहे आमच्यावर ही असली थिल्लरगिरी दुसरीकडे जाऊन कर भावा, इथे नाही…”,
जुईलीने हा स्क्रिनशॉट तिच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केला आणि पुढे लिहिलं, आम्ही रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी एखादी कला सादर करतो...गाणं बनवणं ही कला आहे.. क्रिएटिव्हीवर शिव्या मिळाव्या? का करतो मग आम्ही हे सगळं? जुईची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिला पाठिंबा दिला.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Juilee Joglekar: 'अय्य भाई, भाषा सांभाळ" शिव्या देणाऱ्यावर संतापली जुईली जोगळेकर, म्हणाली 'असली थिल्लरगिरी..'
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement