Tips And Tricks : घाणेरडे इअरबड्स 'या' टिप्सने काही मिनिटांत होतील स्वच्छ, वाढेल आवाजाची गुणवत्ता
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Earbuds Cleaning : घाणेरडे इअरबड्स अनेकदा आवाजाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. या सोप्या घरगुती पद्धतीने तुम्ही तुमचे इअरबड्स काही मिनिटांत स्वच्छ करू शकता. धूळ आणि घाण काढून टाकली जाईलच. पण तुमचा संगीताचा अनुभवही सुधारेल.
आजकाल इअरबड्स प्रत्येकासाठी एक आवश्यक गॅझेट बनले आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करत असाल किंवा जिममध्ये व्यायाम करत असाल, ते नेहमीच तुमच्यासोबत असतात. मात्र सतत वापरल्याने घाम, धूळ आणि कानातले मेण त्यात जमा होतात. यामुळे आवाजच व्यवस्थित येत नाही आणि कानांसाठीही हे हानिकारक ठरू शकते. म्हणून इअरबड्सची नियमित स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.
advertisement
इअरबड्सच्या मेष स्क्रीनवर घाण आणि धूळ जमा होणे सामान्य आहे. ते स्वच्छ करण्यासाठी इअरबड्स जाळी खाली ठेवून उलटे धरा. नंतर मऊ-ब्रिस्टल टूथब्रशने हळूवारपणे ब्रश करा. जर घाण अडकली असेल, तर कापसाला थोडे रबिंग अल्कोहोलमध्ये भिजवा आणि जाळीवर हळूवारपणे घासा. मात्र यावर जास्त दाब देऊ नका. कारण यामुळे जाळी खराब होऊ शकते.
advertisement
जर तुमच्या इअरबड्समध्ये सिलिकॉन किंवा फोम टिप्स असतील तर त्या काढून स्वच्छ करणे महत्वाचे आहे. सिलिकॉन टिप्स 15-20 मिनिटे कोमट, साबणाच्या पाण्यात भिजवा. नंतर त्या हलक्या हाताने स्वच्छ करा आणि टॉवेलवर वाळवा. फोम टिप्स जास्त वेळ भिजवू नका. कारण त्या लवकर पाणी शोषून घेतात. टिप्स पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच पुन्हा घाला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लोक घरी चित्रपट पाहण्यापासून ते कामाच्या ठिकाणी झूम कॉलमध्ये सहभागी होण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी इअरबड्स वापरतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे छोटे गॅझेट्स किती लवकर घाण होतात? घाम, इअरवॅक्स, धूळ आणि तेल त्यात जमा होऊ शकते, जे केवळ त्यांचा आवाजच नाही तर तुमच्या कानांसाठी देखील हानिकारक असू शकते. म्हणून तुम्हाला ते कसे स्वच्छ करायचे हे माहित असले पाहिजे.
advertisement