Rani Mukherjee: 'माझ्या मुलीचं मन दुखावलं, ती रडत होती' राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर असं का म्हणाली राणी मुखर्जी?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rani Mukherjee: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हजारो लाखो लोकांची क्रश आहे. तिचा चाहतावर्ग भरपूर मोठा आहे. नुकताच राणीला नॅशनल अवॉर्ड मिळाला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हजारो लाखो लोकांची क्रश आहे. तिचा चाहतावर्ग भरपूर मोठा आहे. नुकताच राणीला नॅशनल अवॉर्ड मिळाला. मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा 2025 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राणीने नुकत्याच एका मुलाखतीत या क्षणाचा आनंद आणि अनुभव शेअर केला.
पुरस्कार स्वीकारताना राणीच्या मनात आणि गळ्यात केवळ तिची भूमिकाच नव्हे, तर तिची 10 वर्षांची मुलगी आदिरा चोप्रा हिचे प्रेमही होते. तिने पुरस्कार स्विकारताना लेकीच्या नावाचं लॉकेट घातलं होतं.
राणी मुखर्जीने नुकत्याच एका मुलाखतीत हा गोड आणि भावनिक किस्सा सांगितला. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या वेळी उपस्थित राहण्याची आदिराची इच्छा होती. परंतु, या सोहळ्याला उपस्थितीसाठी काही नियम आहेत. त्या नियमांनुसार, 14 वर्षांखालील मुलांना सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नसते.
advertisement
राणीने सांगितले की, "आदिरा या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी रडत होती. जेव्हा मी तिला सांगितले की ती माझ्यासोबत येऊ शकत नाही, तेव्हा ती म्हणाली की माझ्या आयुष्यातील एवढ्या खास दिवशी ती माझ्यासोबत नसणे 'अन्याय्य' आहे." मुलीला शांत करण्यासाठी आणि या महत्त्वाच्या दिवशी तिला सोबत ठेवण्यासाठी राणीने एक खास उपाय केला. 'तू माझ्या खास दिवशी माझ्यासोबत असशील,' असे वचन राणीने आदिराला दिले होते आणि ते पूर्ण केले. तिने लेकीच्या नावाचं पेंडेंट गळ्यात घातलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rani Mukherjee: 'माझ्या मुलीचं मन दुखावलं, ती रडत होती' राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर असं का म्हणाली राणी मुखर्जी?