हास्य, आपुलकी आणि भावनिकतेचा सुंदर संगम असलेली ही कथा नवविवाहित मानस्वी आणि तिची सासू स्मिता यांच्याभोवती फिरते. सुरुवातीला व्यक्तिमत्त्वातील संघर्षाने सुरू झालेला हा प्रवास हळूहळू समज, स्वीकार आणि अनपेक्षित मैत्रीत बदलतो. दैनंदिन प्रसंग, खुमासदार संवाद आणि हृदयस्पर्शी क्षणांमधून हा चित्रपट दाखवतो की सहानुभूती आणि एकत्र अनुभवांमुळे कौटुंबिक नाती कशी अधिक घट्ट होत जातात.
advertisement
( OTT वर येताच हिट, बनली नंबर 1! कोरियात शूट केलेल्या या भारतीय फिल्मसमोर कोरियन ड्रामाही फेल )
निर्मिती सावंत, प्रार्थना बेहेरे, राजन भिसे आणि नकुल घाणेकर हे दमदार कलाकार सिनेमात आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले "ही कथा आपल्या घरातील अगदी ओळखीच्या वातावरणातून जन्माला आली आहे सासू आणि सुनेमधील खोडकर चकमकी, मतभेद आणि शेवटी निर्माण होणारी समजूत. विनोद आणि भावनांमधून आम्हाला अशा नात्याची गोष्ट सांगायची होती जी ठराविक साचे मोडून कुटुंबात महिलांची ताकद आणि भूमिका दाखवते.”
अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या "या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात जरी विनोद आणि संघर्षाने होत असली तरी पुढे तो दोन स्त्रिया एकमेकींना समजून घेण्याचा अतिशय भावनिक आणि स्तरित प्रवास दाखवतो. स्मिताची भूमिका साकारणं खूप मजेशीर होतं कारण ती मजबूत, स्पष्टवक्ती आणि खूप खरी वाटणारी व्यक्तिरेखा आहे.”
प्रार्थना बेहेरे सांगते "मानस्वी ही लग्नानंतर नव्या कुटुंबातील नातेसंबंध समजून घेणाऱ्या अनेक तरुण स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. हा चित्रपट दाखवतो की नाती सुरुवातीपासून परिपूर्ण नसतात, पण संयम आणि समजूतदारपणामुळे ती खूप सुंदर आणि अर्थपूर्ण बनू शकतात. आता हा प्रवास ZEE5 वर प्रेक्षकांना अनुभवता येणार याचा मला खूप आनंद आहे"
विनोद, भावना आणि आपुलकीने भरलेले कौटुंबिक क्षण यांचा सुंदर मेळ असलेला "अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई ? हा सिनेमा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 19 मार्च रोजी ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
