परंतु त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अजय देवगनचा एक सिनेमा तयार व्हायच्या आधीच बंद पडला आहे. या सिनेमासाठी त्याने चांगली तयारी केली होती. कोणता होता हा सिनेमा? 'रामरी' असं सिनेमाच आहे. हा सिनेमा अजय देवगन प्रोड्युस करणार होता. अजय देवगनच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली खूप सिनेमे रिलिज झाले आहेत. काही फ्लॅाप सुद्धा झाले आहेत. पण या मोठ्या सिनेमाला का बंद करावा लागला?
advertisement
'त्याने मला Kiss केलं, पण पैसेच दिले नाही', फराह खानचा खळबळजनक खुलासा, काय आहे हे प्रकरण?
का बंद पडला हा सिनेमा ?
मीडिया रिपोर्टनुसार. 'रामरी' हा बिग बजेट असणारा सिनेमा आहे. सिनेमाला 1945 च्या बॅकड्रॅापवरती सेट करायचा होता. यावरती खूप काळ काम सुरु होते. मेकर्सचे म्हणणे होते की , ऐतिहासिक घटनांना सिनेमाच्या गोष्टीशी मिळवूया, पण सिनेमाच्या प्रोडक्शन आणि इतर मागणीपेक्षा बजेट कमी होते. ओटीटी वरती हा सिनेमा जोरदार चालला असता. परंतु बजेटमुळे या सिनेमाला पुर्ण विराम मिळाला.
नेहमीप्रमाणे ओटीटी प्लॅटफॅार्म वाले खूप उत्सुक होते. पण बजेट कमी असल्याने सगळं पणाला लावले तरी काही होऊ शकणार नव्हते. त्यामुळे असा निर्णय घेतला गेला की, या सिनेमाचे काम थांबवूया. असे बोलले जाते की, 'रामरी' ला ऑफिसिअली हिरवा कंदिल कधी दिलाच नाही. फिल्म प्रे -प्रोडक्शन प्रोसेस मध्ये चर्चा चालू होती. पण ते काम थांबवले गेले.
या सिनेमात कोण कोण होते.. ?
या सिनेमामध्ये सिंध्दांत चतुर्वेदी सोबत शिव मोहित रैनालाही घेण्यात आले. त्यातच नेहा शर्मा हिचा डायरेक्टर म्हणून पहिला सिनेमा होता.