आपण बोलत असलेला हा शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणजे अक्किनेनी नागेश्वर राव (ए.एन.आर.). त्यांनी 1941 मध्ये धर्मपत्नी या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं. पुढच्या 73 वर्षांत त्यांनी तब्बल 255 हून अधिक चित्रपट केले. तेलुगू, तमिळ, हिंदी आणि कन्नड भाषेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांचा अभिनय रेंज इतका अफाट होता की ते सहजपणे रोमँटिक हिरो, गंभीर नायक, पौराणिक भूमिका आणि सामाजिक विषयांवर आधारित पात्रं साकारू शकत.
advertisement
ओटीटीची बोल्ड अभिनेत्री, कॅमेऱ्यासमोर दिले इंटीमेट सीन; ओलांडल्या मर्यादा
ए.एन.आर. केवळ अभिनेता नव्हते, तर निर्माता आणि दूरदर्शीही होते. 1970 च्या दशकात त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला मद्रास (चेन्नई) वरून हैदराबादकडे आणण्यात मोठं योगदान दिलं. यामुळे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीला स्वतंत्र ओळख मिळाली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. 1968 मध्ये पद्मश्री, 1988 मध्ये पद्मभूषण, 1990 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2011 मध्ये पद्मविभूषण. तसेच, तमिळनाडू सरकारकडून 1992 मध्ये अरिग्नार अण्णा पुरस्कार मिळाला.
आज त्यांचा सुपरस्टार वारसा त्यांचा मुलगा नागार्जुन आणि नातवंडं नागा चैतन्य व अखिल अक्किनेनी पुढे नेत आहेत. अहवालांनुसार, 2017 मध्ये नागार्जुनच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 3,754 कोटी इतकी होती.