TRENDING:

मराठी मालिकेची हिरोईन, लेडी स्मगलर बनून OTT गाजवलं; आता नव्या अवतारासह टेलिव्हिजनवर कमबॅक

Last Updated:

Marathi Actress : लेडी स्मगलरची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ओटीटी गाजवून पुन्हा टेलिव्हिजनवर दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनेक कलाकार ओटीटी माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. अनेक मराठी कलाकारही ओटीटी विश्वात पदार्पण करू लागले आहेत. एका प्रसिद्ध मराठी मालिकेची अशीच एक हिरोईन जिनं हिट नायिकेचा टॅग आपल्या नावे केला. आजही प्रेक्षक तिच्यावर तितकंच प्रेम करतात. या अभिनेत्री ओटीटीवर काम करायला सुरुवात केली. थेट लेडी स्मगलर बनून तिनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. आधी मालिका नंतर ओटीटी विश्वात आपली छाप सोडून ही अभिनेत्री पुन्हा एकदा टेलिव्हिजन गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
News18
News18
advertisement

हिंदी टेलिव्हिजन विश्वातून सुरू झालेला तिचा प्रवास आज ओटीटी पर्यंत येऊन पोहचला आणि आता पुन्हा प्रेक्षकांची लाडकी सुंदरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक आता छोट्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. अँड टीव्ही वर येणाऱ्या आगामी मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

( TV वर येण्याआधीच हिट ठरतेय ही नवी मराठी मालिका; TRP सोडा, बनवला वेगळाच रेकॉर्ड )

advertisement

'हे भगवान कितना बदल गया इंसान' असं अक्षयाच्या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत ती काय भूमिका साकारणार या साठी सगळेच उत्सुक आहेत. अक्षयाने तिच्या करीयरची सुरुवात ही हिंदी मालिका पासून सुरू केली होती पुढे मराठी मालिका मग ओटीटी असा तिचा प्रवास आज दमदार सुरू आहे.

अक्षया नुकतीच नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित वेब सीरिज असलेल्या 'तस्करी' मध्ये दिसली होती. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सोबत असलेल्या तिच्या या खास भूमिकेचं देखील प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. लेडी स्मगलर असलेल्या स्वाती साळुंखे ही लक्षवेधी भूमिका तिनं साकारली. सोबतीला ग्रेटर कलेश सारख्या चित्रपटात देखील तिच्या छोट्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक काजळामुळे डोळ्यांना धोका? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

ओटीटी गाजवून पुन्हा टीव्ही वर येण्याबद्दल अक्षया म्हणाली, "या नव्या मालिकेसाठी खरतर मी खूप उत्सुक आहे. टेलिव्हिजन करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की एक कलाकार म्हणून रोज त्या कलेचा सराव होत असतो आणि कुठेतरी मी माझ्या आयुष्यात हे रूटीन मिस करत होते. आता या मालिकेमुळे पुन्हा रोज काम करत राहण्यातली मज्जा अनुभवयाला मिळणार अशी आशा आहे. या मालिके निमित्तानं नवीन लोकांबरोबर काम करायला मिळतंय याचा आनंद देखील वेगळा आहे"

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
मराठी मालिकेची हिरोईन, लेडी स्मगलर बनून OTT गाजवलं; आता नव्या अवतारासह टेलिव्हिजनवर कमबॅक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल