advertisement

TV वर येण्याआधीच हिट ठरतेय ही नवी मराठी मालिका; TRP सोडा, बनवला वेगळाच रेकॉर्ड

Last Updated:
Sanai Chaughade : एक नवी मराठी मालिका जी लवकरच टीव्हीवर येणार आहे. पण त्याआधीच या मालिकेची हवा आहे. मालिका प्रोमो पाहूनच प्रेक्षक भारावले आहेत.
1/5
सामान्यपणे सीरिअल सुरू झाली की किती प्रेक्षक पाहत आहेत, त्याचं टीआरपी किती यावर ती मालिका हिट ठरते. पण एक नवीन <a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-serial/'>मराठी मालिका </a>जी टीव्हीवर येण्याआधीच हिट ठरते आहे.
मराठी मालिका जी टीव्हीवर येण्याआधीच हिट ठरते आहे." width="1600" height="900" /> सामान्यपणे सीरिअल सुरू झाली की किती प्रेक्षक पाहत आहेत, त्याचं टीआरपी किती यावर ती मालिका हिट ठरते. पण एक नवीन मराठी मालिका जी टीव्हीवर येण्याआधीच हिट ठरते आहे.
advertisement
2/5
वेगवेगळ्या मराठी चॅनेल्सवर वेगवेगळ्या मराठी मालिका येत आहेत. काही मालिका सुरू झाल्या आहेत, काहींचे प्रोमो आले आहेत. त्यापैकीच ही एक मालिका. ही मालिका आहे सनई चौघडे, चार मुली आणि त्यांच्या लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या आईची स्टोरी दाखवण्यात आली आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज होऊ अवघे काही तास उलटले आहेत.

3/5
झी मराठीवरील ही मालिका कधीपासून येणार आहे, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मालिकेची तारीख आणि वेळ सांगितलेली नाही. पण फक्त प्रोमोमुळेच ही मालिका हिट ठरते आहे. झी मराठीने दिलेल्या माहितीनुसार या मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेने इन्स्टाग्रामवर 1 दशलक्ष व्ह्युजचा टप्पा गाठला आहे.

4/5
या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मेघना एरंडे अनेक वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने या मालिकेत आईची भूमिका साकारली आहे. तर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील सुहस शिरसाट बाबाच्या भूमिकेत आहे.

5/5
चार मुलींच्या भूमिकेत चार अभिनेत्री झळकणार आहेत. यात 'वागले की दुनिया' या हिंदी मालिकेतील सखी म्हणजेच अभिनेत्री चिन्मयी साळवी, जुई गोगरी, रुची नेरुरकर यांचा समावेश आहे. तर 'तुझ्यात जीव रंगला', प्रेमाची मालिकेतून झळकलेला अभिनेता 'राज हंचनाळे'ही मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहे.

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement