पुणे : 'बारीक म्हणजे सुंदर' ही विचारसरणी वर्षानुवर्षे समाजात रुजली आहे. त्यामुळे आजकाल कितीही धावपळीचं आयुष्य असलं तरी अनेकजण बारीक होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. मात्र वजन कमी कसं करावं हेच कळत नाही. कारण काहीजणांचं वजन काही केल्या किंचितही कमी होत नाही किंवा कमी होतं आणि पुन्हा वाढतं. तुम्हाला माहितीये का, वजन कमी करण्यासाठी लोक चक्क सर्जरीसुद्धा करतात.



