गुलाबी साडी, लाइट मेकअप मेकअप आणि चेहऱ्यावर गोड स्माइल घेऊन आलिया भट्टने पुन्हा एकदा सिद्ध केले की ती का खास आहे. आलियाने या साडीसोबत फेदरचे कानातले घातले होता ज्यामुळे तिच्या लूकमध्ये आणखी भर पडली. तिने कॅमेऱ्यासमोर हॅप्पी पोझेस देखील दिल्या. रिया कपूर हिने आलियाचा हा लूक तयार केला आहे. रियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रेखाच्या 'सिलसिला' लूकचा फोटोही शेअर केला.
advertisement
रेखाचा 'सिलसिला' अजूनही संस्मरणीय
'सिलसिला' हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. ज्यामध्ये रेखासोबत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन देखील होते. चित्रपटाची कथा आणि गाणी हिट झाली होती. रेखाचा संपूर्ण 'चांदनी' लूक देखील आजपर्यंत सुपरहिट आहे. हा रेखाचा अमिताभसोबतचा शेवटचा चित्रपट होता.
'उमराव जान' रि-रिलीज
'उमराव जान' आज थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे. 'नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' आणि 'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन' अंतर्गत नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाने तो पुनर्संचयित केला आहे. 19 व्या शतकातील लखनौमध्ये सेट केलेल्या या चित्रपटात रेखाने 'अमिरन'ची भूमिका साकारली होती. जी एका वेश्यालयात पोहोचते तिच्या आयुष्यातील चढ-उतार तीन महत्त्वाच्या पात्रांसह पाहायला मिळतो. फारुख शेख, राज बब्बर आणि नसीरुद्दीन शाह देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते.
आलियाचे आगामी चित्रपट कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती यशराज फिल्म्सच्या 'अल्फा' या अॅक्शन चित्रपटातही धमाल करणार आहे.