TRENDING:

Alia Bhatt: रश्मिका, कतरिनानंतर आलिया भट्टही Deepfake Videoची शिकार, चाहते नाराज

Last Updated:

व्हायरल होत असलेल्या आलियाच्या डिपफेक व्हिडीओमध्ये एका मुलानं निळ्या रंगाचे फ्लोरल डिझाइन असलेले कपडे घातले आहेत. हा व्हिडीओ पाहून आलियाचे चाहते चांगलेच भडकले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 27 नोव्हेंबर : बदललेल्या टेक्नोनॉजिमुळे अनेक गोष्टी सोप्प्या झाल्यात. अनेक काम जलग गतीनं होऊ लागली आहेत. मात्र त्याचे होणारे दुष्परिणामही तितकेच गंभीर आहेत. सध्या डीपफेक व्हिडीओ आणि फोटोची सर्वत्र दहशत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना, काजोल आणि कतरिना यांच्यानंतर बॉलिवूडची सध्याची सर्वात आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट हिचा देखील डिपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. सोशल मीडियावर आलियाचा डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाला असून पुन्हा एकदा या डिपफेकची भिती सर्वांच्या मनात घरी राहिली आहे.
 Alia Bhatt Deepfake
Alia Bhatt Deepfake
advertisement

आलिया भट्ट ही सध्याची सर्वाधिक प्रसिद्धी झोतात असलेली अभिनेत्री आहे. पर्सनल आणि प्रोफेशन अशा दोन्ही आयुष्यात ती तग धरून उभी आहे. तिनं केलेल्या एकाहून एक दमदार सिनेमांमुळे ती कायम चर्चेत राहिली आहे. तिची प्रसिद्धी पाहता तिच्या चेहऱ्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर करण्यात आलाय.

हेही वाचा - Bigg Boss 17 मध्ये इमरान हाशमीची एंट्री? लेटेस्ट एपिसोडमधील 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच

advertisement

व्हायरल होत असलेल्या आलियाच्या डिपफेक व्हिडीओमध्ये एका मुलानं निळ्या रंगाचे फ्लोरल डिझाइन असलेले कपडे घातले आहेत. ती बेडवर बसली असून हात वर करून ती कॅमेरासमोर अश्लिल चाळे करताना दिसतेय. या मुलीच्या चेहऱ्याच्या जागी आलियाचा चेहरा डिपफेक कऱण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. आलियाचा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

advertisement

या आधी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा लिफ्टमधील एक डिपफेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. रश्मिकाच्या व्हिडीओनंतर अभिनेत्री काजोलच्या कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ आणि त्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ हिचा टाइगर 3मधील एक फोटो देखील अशाच प्रकारे डिपफेक करण्यात आला होता. रश्मिका, कजोल आणि कतरिना यांच्या डिपफेक व्हिडीओ आणि फोटोनंतर अभिनेत्री आलिया देखील डिपफेक व्हिडीओची शिकार झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

बॉलिवूड अभिनेत्रीच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ही एक डिपफेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये मोदी काही स्त्रियांबरोबर गरबा खेळताना दिसत होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मोदींनी देखील चिंता व्यक्त केली होती. "आर्टिफिशिअल इंटेलिजेंस आणि डीपफेक व्हिडीओमुळे चिंता वाढत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेंस हे आपल्याला खूप मोठ्या संकटाकडे घेऊन जाईल. यामुळे असंतोषाची आग वेगाने पसरवू शकतो", असं मोदींनी म्हटलं होतं.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Alia Bhatt: रश्मिका, कतरिनानंतर आलिया भट्टही Deepfake Videoची शिकार, चाहते नाराज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल