Bigg Boss 17 मध्ये इमरान हाशमीची एंट्री? लेटेस्ट एपिसोडमधील 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस हा शो फॅमिली शो म्हणूनही ओळखला जातो. पण बिग बॉसचा 17वा सीझन हा फॅमिली शोच्या नावानं कलंक आहे असं अनेकांनी प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
मुंबई, 27 नोव्हेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस 17मध्ये रोज नवा ड्रामा पाहायला मिळतोय. घरात अंकिता आणि विक्की जैनची भांडण पाहून प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अशातच बिग बॉसच्या घरात ऑरीची एंट्री झाली होती. ऑरी एक दिवसासाठी घरात आला होता. एक दिवस घरात राहून ऑरी देखील घराबाहेर पडला आहे. पण तुम्हाला माहिती आहे घरात ऑरी येण्याआधीच इमरान हाशमीची एंट्री झाली. आता तुम्ही म्हणाल, मग इमरान हाशमी अजून स्क्रिनवर दिसला का नाही. बिग बॉस 17च्या घरातील इमरान हाशमीला पाहायचं असेल तर एक व्हिडीओ तुम्हाला पाहावा लागेल.
बिग बॉस हा शो फॅमिली शो म्हणूनही ओळखला जातो. अनेक फॅमिली अनेक वर्ष सातत्यानं बिग बॉस हा शो पाहत आले आहेत. बिग बॉसचा एक वेगळा फॅनबेस आहे. पण बिग बॉसचा 17वा सीझन हा फॅमिली शोच्या नावानं कलंक आहे असं अनेकांनी प्रेक्षकांनी म्हटलं आहे. घरात सध्या एकीकडे अंकिता-विक्कीची भांडणं तर दुसरीकडे ईशा-समर्थ यांचा रोमान्स पाहायला मिळतोय. ईशा-समर्थ यांचं घरातील वागणं पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.
advertisement
आता तुम्हाला अंदाज आला असे की बिग बॉस 17च्या घरातील इमरान हाशमी म्हणजे कोण. बिग बॉस 17च्या घरातील अगणित भांडणांमध्ये ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांचा रोमान्सची वेगळीच चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या घरातील दोघांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात ते खुलेआम रोमान्स करताना दिसत आहे.
advertisement
advertisement
ईशा आणि समर्थ यांचे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'बिग बॉस 17 हा आता फॅमिली शो राहिलेला नाही', 'बिग बॉसच्या घरात इमरान हाशमी आलाय', असंही अनेकांनी कमेंट्स करत लिहीलं आहे. तर काहींनी 'हा तर इमरान हाशमी लाइट' असंही म्हटलं आहे.
तर 'निरजा' फेम अभिनेत्री काम्या पंजाबी हिनं देखील ईशा-समर्थ यांच्या वागण्यावर ट्वीट करत कान उघडणी केली आहे. तिनं लिहिलंय, 'इशा आणि समर्थ तुम्हा दोघांचे आभार. पण आता आम्हाला माफ करा. मी माझ्या कुटुंबासह माझा आवडता कार्यक्रम पाहू शकत नाही. हे सगळं इथे दाखवू नका. तुम्ही शो सोडा आणि एक खोली विकत घ्या".
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2023 11:09 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 17 मध्ये इमरान हाशमीची एंट्री? लेटेस्ट एपिसोडमधील 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच


