आलिया भट्टचा आहार काय? (Alia Bhatt Diet)
संतुलित आहार करण्यावर आलिया भट्टचा भर असतो. टोमॅटोची चटणी, भेंडीची भाजी, डाळ-भात, पोहे, ताक या पदार्थांचा आलियाच्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. फायबर आणि पोषक तत्तव असणाऱ्या गोष्टी तिला आवडतात. हॉलिवूडचे आहार विशेषज्ञ एंजी कसाबी यांचे सल्ले व्यायासंबंधीत सल्ले आलिया ऐकते. एंजी कसाबी आलियासोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातही काम केलं आहे. आलियाच्या आहारात सर्व प्रकारच्या भाज्या, प्रोटीन आणि डिटॉक्स ड्रिंकचा समावेश असतोच.
advertisement
Sanjay Narvekar : संजय नार्वेकरच्या पाकिस्तानी फॅनने असं काय केलं? दीड फुट्या भाई झालेले निरुत्तर
'असा' करते आलिया व्यायाम (Alia Bhatt Workout)
आलिया भट्ट आठवड्यातील सहा दिवस व्यायाम करते. सहनशक्ती वाढवण्यासाठी कार्डिओ, लवचिकता वाढवण्यासाठी पिलेट्स आणि योगा, आठवड्यातून चार दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करते. अंशुकाकडून आलिया योग प्रशिक्षण घेते. कपोतासन योगप्रकार आलियाला आवडतो. त्यामुळे चाहत्यांनी या आसनाला आलिया पोज हे नाव दिलं आहे.
त्वचेवर लक्ष देणारी आलिया!
आपला चेहरा चमकदार बनवण्यासाठी आलिया सर्वात पहिले एका माइल्ड सेटाफिल क्लींजरचा वापर करते. त्यानंतर टोनर म्हणून बायोमा फेशियल मिस्ट वापरते. या सर्व गोष्टी आलियाला हायड्रेटेड, चमकदार आणि तजेलदार ठेवतात.
आलिया भट्टने रोमँटिक चित्रपटांपासून बायोपिकपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. राझी, डियर जिंदगी, डार्लिंग्स, रॉकी और रानी की कहाणी, उडता पंजाब असे अभिनेत्रीचे अनेक चित्रपट गाजले आहेत. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे.