Sanjay Narvekar : संजय नार्वेकरच्या पाकिस्तानी फॅनने असं काय केलं? दीड फुट्या भाई झालेले निरुत्तर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sanjay Narvekar : अभिनेते संजय नार्वेकर यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. नुकतच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्ट दरम्यान त्यांनी पाकिस्तानी चाहत्याचा किस्सा शेअर केला आहे.
Sanjay Narvekar : अभिनेते संजय नार्वेकर यांनी मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टी चांगलीच गाजवली आहे. मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्ट दरम्यान त्यांनी पाकिस्तानी चाहत्यासोबत घडलेला रिअल किस्सा शेअर केला आहे. विशेष म्हणजे या पाकिस्तानी चाहत्याने संजय नार्वेकर यांना निरुत्तर केलं होतं.
संजय नार्वेकर म्हणाला,"चाहत्याने मला दीड फुट्या भाई, अशी हाक मारुन मला मिठी मारली. चित्रपटांतील माझं काम पाहिल्याचं त्याने मला सांगितलं. त्यावेळी तो पाकिस्तानी असल्याचं मला म्हणाला. त्यावेळी पाकिस्तानात हे पाहिलं जातं का?, असं मी त्याला विचारलं असता त्याने होकार दिला. पुढे त्याने मला लायटर आणि सिगारेटचं पाकिट दिलं. मी त्याला पैसे देत होतो. तर त्याने हे माझ्याकडून आहे, असं म्हणत पैसे घेतले नाहीत. मी पैसे परत दिल्याने हा चाहता म्हणाला,"भाईसाहब पाकिस्थानसे हूँ इसलिए?". त्यावेळी मी त्याच्याकडून लायटर आणि सिगारेटचं पाकिट घेतलं आणि खिशात ठेवलं काही बोललो नाही. कलेला जात-धर्म काहीही नसतो".
advertisement
advertisement
संजय नार्वेकर यांना 'वास्तव' या चित्रपटातील देढ फूटी भाई या भूमिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे. तसेच चश्मेबदाद्दूर, जबरदस्त, खबरदार या चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. फक्त मराठीपुरतं मर्यादित न राहता हिंदीतही त्यांनी उत्तम काम केलं आहे. नायक असो वा खलनायक आपल्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी वेगळेपण निर्माण केलं आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृती देणाऱ्या संजय नार्वेकर यांच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 5:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sanjay Narvekar : संजय नार्वेकरच्या पाकिस्तानी फॅनने असं काय केलं? दीड फुट्या भाई झालेले निरुत्तर