वेदिका प्रकाश शेट्टी असं आलियाच्या पर्सनल असिस्टंटचं नाव आहे. अनेक वर्ष ती आलियाबरोबर काम करत होती. वेदिका शेट्टीवर आलिया भट्टचं Eternal Sunshine Productions Pvt Ltd या प्रोडक्शन हाऊसकडून आणि तिच्या वैयक्तिक खात्यांतून एकूण 76,90,892 हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
तब्बल 76 लाखांचा गैरव्यवहार
पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टीने आपल्या पदाचा आणि कामाचा गैरफायदा घेऊन फसवणूक केली. आलियाच्या खात्यांतून आणि कंपनीच्या पैशातून अनेक खोटी बिलं बनवली. खोटी बिले तयार करुन तिने रक्कम काढली. काही महिन्यांपासून ही रक्कम हळूहळू काढली जात होती. वेदिका कडून होत असलेल्या व्यवहारांवर कंपनी आणि आलियाची टीम लक्ष ठेवून होती. अखेर त्यांनी तिची चौकशी करुन हा गैरव्यवहार उघडकीस आणला.
आलिया भट्टच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
आपल्याचं पर्सनल असिस्टंटकडून आपली फसवणूक होत आहे हा प्रकार जेव्हा आलिया भट्ट आणि तिच्या टीमच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी तात्काळ जुहू पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पर्सनल असिस्टंट वेदिका शेट्टी विरोधात गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी तिची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आलिया भट्टला मोठा मनस्ताप आणि नुकसान सहन करावं लागलं आहे.
आलियाच्या प्रोडक्शन हाऊसला मोठा धक्का
अभिनेत्री आलिया भट्ट दहाहून अधिक वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत आहे. तिच्या करिअरचा ग्राफ नेहमीच उंचावणारा ठरला आहे. तिने अभिनेत्री होत असताना निर्माती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. आलिया भट्टने Eternal Sunshine Productions Pvt Ltd या नावाने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे.