अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलंय, "कोणीतरी मला सांगितले की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईत राहतोस. हे खरे आहे, पण ते शिकण्याचा प्रयत्न कर, हे शिकणे देखील एक सलाम आहे."
( एका नावाचे 2 चित्रपट, वडिलांचा फ्लॉप, 22 वर्षांनी मुलाने रचला इतिहास; 58 CR बजेट 193 कोटींची कमाई )
advertisement
मागच्या काही दिवसांत मुंबईत मराठी भाषा वाद चांगलाच उफाळून आला होता. तेव्हा मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतीही टिप्पणी केली नव्हती. मग आता अचानक त्यांनी मराठी भाषा यावर पोस्ट का शेअर केली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं कारणही बिग बींची एक चूक आहे.
अमिताभ बच्चन यांनी लालबागच्या राजासंबंधी एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी काही दिवसांआधीच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा एक लालाबगच्या राजाचा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेलं, "गणपती बाप्पा मोरया. लाल बाग च राजा!!!" त्यांच्या व्याकरणातील चूक त्यांच्या चाहत्याने त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर ती चूक स्वीकारली.
दुसरी पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं, "माझ्या एका शुभचिंतकानं म्हटलं की, मी कालच्या ट्विटमध्ये चुकीचा शब्द लिहिला. मी तो योग्य शब्द लिहित आहे. लालबाग 'च' राजा असं मी लिहिलं होतं. त्यांनी सांगितलं की, 'चा' पाहिजे. मी तो शब्द दुरूस्त करत आहे. लालबाग चा राजा. क्षमा प्रार्थी."
बिग बी यांनी चूक तर स्वीकारली पण फेसबुकवर मराठीत पोस्ट लिहिताना मात्र गुगल स्ट्रान्सलेशनचा वापर केला. नेटकऱ्यांनी बिग बींची ही चूक शोधून काढली आणि त्यांना कमेंट सेक्शनमध्ये झाप झाप झापलं.
एका युझरनं लिहिलंय, "तुम्ही हे गूगल ट्रांसलेटर मधून भाषांतर केल आहे. ते चुकीच भाषांतर झाल आहे. मराठी भाषा बोलायला शिकणे अवघड नाही फक्त ते मनापासून शिकणे मनापासून पाहिजे"
दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "सर बरोबर आहे, रजनीकांत हे मराठी असुन सुद्धा ते तमीळनाडु ला आपली कर्मभूमी मानतात आणि त्यांनी तमीळ भाषा पुर्णपणे आत्मसात केली आहे, त्यांचं बालपण हे कर्नाटक मध्ये गेले त्यामुळे त्यांना कन्नड भाषा येते, तसेच रजनीकांत हे मराठी, हिंदी, इंग्रजी,तमीळ तेलगु, भाषेत संवाद साधु शकतात.आणि तुम्हाला महाराष्ट्राने एवढे मोठे केले पण तुम्ही अजून पण मराठी व्यवस्थित नाही बोलु शकत याची आम्हाला खंत वाटते."