अमिताभ बच्चन यांची पोस्ट काय?
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"मोज्यावर iPhone ; iPhone खाली मोजा समजत नाही ओ भैया, आपण काय शोधलं अअअअअअ कु कु कु कु कु uuuuu." या पोस्टवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया मजेशीर रिअॅक्शन पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहिलं, "कोणता आयफोन, कोणता मोजा?" दुसऱ्या युजरने अभिनेता अमिताभ बच्चन यांचाच एक मीम शेअर केला, ज्यावर लिहिलं होतं, "अशा पोस्टसाठी आपण तुम्हाला सलाम ठोकतो." तिसऱ्या युजरने लिहिलं, "अरे मला तर चक्कर यायला लागली आहे."
advertisement
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमुळे लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे पहिल्यांदाच झालेलं नाही यापूर्देखील बिग बींनी सोशल मीडियावर आपल्या गाडीचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये समोरच्या काचेला लटकत असलेली 'लाबूबू' नावाची बाहुली दिसत होती. व्हिडीओ शेअर करत अमिताभ बच्चन यांनी लिहिलं होतं,"देवींनो आणि सज्जनहो, सादर आहे 'लाबूबू', आता माझ्या कारमध्ये सुद्धा." त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
नुकत्याच पार पडलेल्या 70व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बच्चन कुटुंबाला सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांचा सन्मान करण्यात आला. फिल्मफेअरच्या 70 वर्षांच्या पूर्णतेनिमित्त जयांना सन्मानित करण्यात आलं, अभिषेकला 2025 चा सर्वोत्तम अभिनेता (बेस्ट अॅक्टर) म्हणून पुरस्कार मिळाला आणि बिग बींनाही फिल्मफेअरच्या या 70 वर्षांच्या सोहळ्यात खास सन्मान देण्यात आला. अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.