मक्याचे दर गडगडले
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 12 हजार 882 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 5 हजार 612 क्विंटल लाल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1200 ते जास्तीत जास्त 1601 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2400 ते 2500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटला आवक झालेल्या 550 क्विंटल सोयाबीनला 1300 रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला.
advertisement
पारंपरिक पिकाला फाटा, विकासने केली रेशीम शेती, वर्षाला 5 लाख कमाई
कांद्याचे मार्केट कोसळले
राज्याच्या मार्केटमध्ये 47 हजार 999 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 21 हजार 543 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 2100 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 340 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1400 ते 2500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये 7 क्विंटल कांद्याची सर्वात कमी आवक होऊन त्यास कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 1000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची कोंडी
राज्याच्या मार्केटमध्ये 53 हजार 311 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 19 हजार 917 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3450 ते 4150 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 543 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनला 3500 ते 4301 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. चंद्रपूर मार्केटमध्ये सर्वात कमी 12 क्विंटल सोयाबीनची सर्वात कमी आवक होऊन त्यास 3500 रुपये सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.