अमिताभ बच्चन यांनी शेअर केला किस्सा
अमिताभ बच्चन यांनी 'केबीसी 17'मध्ये हॉट सीटवर बसलेल्या कारपेंटर चंदर पाल यांना सिगारशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA ने कथितपणे कोणत्या नेत्याला विषारी सिगारद्वारे मारण्याचा प्रयत्न केला होता? असा हा प्रश्न होता. या प्रश्नाचं चंदर यांनी अचूक उत्तर दिल्यानंतर बिग बींनी एक मजेदार किस्सा शेअर केला. अमिताभ बच्चन म्हणाले," करिअरच्या सुरुवातीला मित्रांसोबत अमेरिकेला फिरायला गेलो होतो. सर्वांनी सांगितलं की इथले क्लब्स आणि बार खूप प्रसिद्ध आहेत. तिथं जायचं म्हणून सर्वांनी मिळून प्लॅन केला. सर्व मित्र तयार होऊन बारजवळ पोहोचलो, तर तिथं बारच्या बाहेर बाउंसर्स उभे होते. त्यांनी आम्हाला आत जाऊ दिलं नाही आणि तिथून हाकलून दिलं.”
advertisement
भारताने Oscars 2026 साठी पाठवला 'होमबाऊंड', कान्समध्ये मिळालेलं 9 मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन,कुठे पाहाल?
बिग बी पुढे म्हणाले,"तिथे असं मानलं जातं की, जे मोठ्या गाड्यांमधून येतात, त्यांनाच बारमध्ये प्रवेश मिळतो. मग आम्ही सगळ्यांनी मिळून पैसे जमा केले आणि लिमोसीन ही मोठी गाडी भाड्याने घेतली. त्यात बसून सगळे क्लबपर्यंत पोहोचलो. राग दाखवण्यासाठी आम्ही सिगारही हाहात धरली होती. जसं बारच्या गेटजवळ पोहोचलो, बाउंसर्सनी लगेच वाट मोकळी केली आणि आम्ही आत प्रवेश केला.” हा किस्सा सांगितल्यानंतर बिग बींसह प्रेक्षकांमध्येही हशा पिकला.
अमिताभ बच्चन आजही सक्रिय!
अमिताभ बच्चन आज वयाच्या 82 व्या वर्षीही चित्रपटसृष्टीतीत तेवढेच सक्रीय आहेत. त्यांचा आगामी 'रामायण पार्ट 2' हा चित्रपट 2026 मध्ये दिवाळीदरम्यान प्रदर्शित होणार आहे. आपल्या पाच दशकांच्या प्रदीर्घ सिने कारकिर्दीत त्यांनी सुमारे 200 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 1969 मध्ये आलेल्या ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1973 मध्ये आलेल्या ‘जंजीर’ या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.