भारताने Oscars 2026 साठी पाठवला 'होमबाऊंड', कान्समध्ये मिळालेलं 9 मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन,कुठे पाहाल?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Homebound : 'होमबाऊंड' या हिंदी चित्रपटाची 2026 च्या ऑस्कर अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या कॅटेगरीमध्ये भारताची अधिकृत निवड ठरली आहे.
Oscars 2026 Homebound : 'होमबाऊंड' या हिंदी चित्रपटाला 2026 च्या ऑस्कर अकादमी पुरस्कारांमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या श्रेणीसाठी भारताची अधिकृत निवड म्हणून निवडण्यात आले आहे. कोलकातामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष एन. चंद्रा यांनी सांगितले की, भारताकडून विविध भाषांतील 24 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते. यात अभिषेक बच्चनच्या 'आय वाँट टू टॉक', 'पुष्पा 2', 'द बंगाल फाईल्स' या बॉलिवूडपटांसह 'दशावतार', 'आता थांबायचं नाय', 'स्थळ' आणि 'साबर बोंडं' या मराठी चित्रपटांचाही समावेश होता. यामधून ‘होमबाऊंड’ या हिंदी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
'होमबाऊंड'चं कथानक काय?
'होमबाऊंड' या चित्रपटाचं कथानक मोहम्मद शोएब आणि चंदन कुमार या दोन मित्रांवर आधारित आहे. पोलीस व्हावं अशी या दोघांचीही इच्छा आहे. पण शोएबला धर्मामुळे तर चंदनला जातीमुळे मर्यादा येतात. त्यांचा संघर्ष प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो की, आपल्याला मेहनत आणि चिकाटी फक्त पुरेशी असते का? आपल्या स्वप्नांपेक्षा समाजाने नियम मोठे असतात का? असे अनेक प्रश्न विचारायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे. नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
advertisement
'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. परदेशातील अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग झालेला हा चित्रपट भारतात 26 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होत आहे.
'होमबाऊंड' ओटीटीवर होणार रिलीज!
'होमबाऊंड' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाईल. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. कान्स 'फिल्म फेस्टिव्हल 2025' मध्ये ‘होमबाउंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून नऊ मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. सर्वांनी उभं राहून चित्रपटासाठी टाळ्या वाजवलेल्या या या चित्रपटाला ऑस्कर मिळालं अशी भारतीय सिनेप्रेक्षकांची इच्छा आहे.
advertisement
'ऑस्कर 2026' कधी आहे?
'ऑस्कर 2026' 15 मार्च 2026 रोजी पार पडणार आहे. जगभरातील सिनेप्रेमींसाठी हा एक महत्त्वाचा पुरस्कारसोहळा आहे. ऑस्कर नॉमिनेशनची अधिकृत घोषणा गुरुवारी 22 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 9:06 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भारताने Oscars 2026 साठी पाठवला 'होमबाऊंड', कान्समध्ये मिळालेलं 9 मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन,कुठे पाहाल?